BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ मार्च, २०२२

सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्यात शाळा, वेळेत मात्र केला बदल !

 


सोलापूर : उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील शाळा उन्हाळ्यात देखील सुरूच राहणार असून आधीच्या आदेशात बदल करून शाळेच्या वेळा (Solapur Disrtict School) मात्र बदलण्यात आल्या आहेत.


उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून  विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी मिळत असते आणि उन्हाळ्यात मामाच्या गावाला जाण्याचा आनंद छोटे विद्यार्थी दरवषी घेत असतात परंतु यावर्षी सुट्टी आणि मामाच्या गावाला जाणे विसरावे लागणार आहे. यावर्षी उन्हाळ्याच्या दिवसात देखील एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असताना शाळा सुरु ठेवण्यास अनेक पालकांचा विरोध होत आहे परंतु राज्य शासनाने एप्रिल महिन्यात देखील शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि यातच शाळांचे दरवाजे बंद झाले. यामुळे विद्यार्थ्यांचे  मोठे नुकसान झाले असून ते भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Schools will start in summer in Solapur district) संपूर्ण एप्रिल महिन्यात शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत


प्राथमिक शिक्षण विभागाने एप्रिलच्या अखेरीपर्यंत शाळा सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरविण्याबाबत आदेश काढले होते पण पालक आणि शिक्षक संघटना यांनी विरोध केल्याने या आदेशात बदल करण्यात आला आहे. वाढत्या उन्हामुळे संपूर्ण दिवस शाळा भरविण्यास विरोध होत होता त्यामुळे आता ही वेळ बदलण्यात आली असून आता सकाळी सात ते दुपारी साडे बारा या वेळेत शाळा भरविण्यात येणार आहे.  सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा, सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक शाळाचे पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहतील (Changes in school hours)असा आधीचा आदेश होता. 


नऊ तास घ्यावेत 

बदललेल्या वेळेनुसार आता सकाळी सात वाजता सुरु होणारी शाळा दुपारी साडे बारा वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी परिपाठ होईल आणि ७ वाजून २५ मिनिटापासून दुपारी साडे बारा वाजेपर्यंत एकूण ९ तास घेतले जावेत, प्रत्येक तासाची वेळ ही अर्ध्या तासाची म्हणजे ३० मिनिटांची असणार आहे असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. शाळांची वेळ कमी केल्याने पालकातून शिक्षण विभागाला धन्यवाद देण्यात आले आहेत. गटशिक्षणाधिकारी, महापालिका, नगरपालिका प्रशासनाधिकारी यांनी तसेच सर्व मुख्याध्यापकांनी या नव्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी असा आदेश देण्यात आला आहे.    .


उपस्थिती बंधनकारक !

सकाळी सात ते दुपारी साडे बारा या वेळेत भरविण्यात येणाऱ्या शाळेत पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के असणे बंधनकारक करण्यात आले आहे.  शनिवारी आणि रविवारी देखील शाळा सुरु राहणार असून सकाळी साडे नऊ ते दहा या वेळेत मधली सुट्टी दिली जाणार आहे.  पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेतली जाणार आहे. 


अभ्यासक्रम पूर्ण नसेल तर --

कोरोनाच्या परिस्थितीमुळे ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसेल अशाच शाळा एप्रिलमध्ये सुरु राहतील, ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे अशा शाळा सुरु ठेवण्याची गरज नाही असे राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज  मांढरे यांनी  म्हटले आहे.  पुढील सत्र जून महिन्यात सुरु होणार असल्याने मे महिन्यात सुट्टी राहील असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.



हे देखील वाचा :

अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !     






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !