इंदापूर : लोकांचे केस कापायचे दुकान चालू ठेवण्यासाठी देखील हप्ता मागितला जात असून हप्त्यासाठी सलून व्यावसायिकावर खुनी हल्ला करण्याचा अजब प्रकार इंदापूर ( Indapur Crime) तालुक्यातील शेळगाव येथे घडला आहे.
व्यापाऱ्यांना धमकावून हप्ते मागणारे भिक्कारछाप दादा अनेक शहरात असतात, अवैध व्यवसाय करणाऱ्यांना तर रोज या हप्ते बहाद्दर भिक्कारछाप गुंडांचा सामना करावा लागतो. हप्ता नाही दिला की त्यांच्याविरोधात तक्रारी करून अवैध धंदे बंद करण्याची मागणी आणि त्यासाठी आंदोलन करणारे तथाकथित पुढारी गल्लोगल्ली दिसतात. समाजातील विकृती एवढ्या खालच्या ठरला गेलेली आहे की, देहविक्री करून पोट भरणाऱ्या महिलांना देखील हप्ते मागणारे भिक्कार दादा आणि त्यांचे चमचे अनेक शहरात दिसून येतात.
दिवसभर उभे राहून सलून व्यावसायिक लोकांचे केस कापण्याचे काम करीत असतात. हा व्यवसाय कष्टाचा असून त्यात काही बेकायादेशीर असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अशा व्यावसायिकावर देखील हप्त्यासाठी दबाव आणला जातो आणि केवळ दबावच नाही तर त्यासाठी खुनी हल्ला करण्याचा प्रकार घडला जातो हे इंदापूर तालुक्यात समोर आला आहे. इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील सलून व्यावसायिक बापूराव शंकर राऊत यांच्यावर खुनी हल्ला करण्याचा प्रकार समोर आला आहे. दर महिन्याला एक हजार रुपये हप्ते दे नाहीतर तुला मारून टाकू अशी धमकी देत धारदार शस्त्राने त्यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. यात राऊत हे गंभीर जखमी झाले आहेत.
सदर घटनेबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून शरद रामा माने, दादा बाबू माने, मल्हारी रोहीदास खोमणे ( शेळगाव, ता. इंदापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. राउत हे आपल्या दुकानात काम करीत असताना हे हप्तेखोर दुकानात आले आणि 'आम्हाला दर महिन्याला एक हजार रुपयांचा हप्ता दे अन्यथा तुला मारून टाकू' अशी धमकी दिली. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर कुऱ्हाड, सत्तूर आणि लोखंडी सुर अशा शस्त्राचा वापर करून जीवघेणा हल्ला केला. (Assault on a salon professional for ransom) दुकानातील एक हजार तीनशे रुपये देखील काढून घेण्यात आले.
हल्लेखोरांनी हप्त्यासाठी केलेल्या हल्ल्यात राऊत जखमी झाले असून त्यांना इंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सलून व्यावसायिकाला देखील हप्ता मागितला जातो हे धक्कादायक असून या भुरट्या आणि भिक्कारछाप 'दादांची' इंदापूर तालुक्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दिवसभर दोन पायावर उभे राहून कष्ट करणाऱ्या व्यावसायिकांना देखील हप्त्यांचा त्रास होत असल्याचे पाहून अन्य व्यावसायीकानाही धक्का बसला आहे. पोलिसांनी अशा बाजारू स्वयंघोषित दादा मंडळीना वठणीवर आणण्याची मागणी जनतेतून पुढे येताना दिसत आहे.
हे देखील वाचा :
- सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची लेक बनली फौजदार !
- बायकोला जाळले, जन्मठेप झाली पण उच्च न्यायालयात निर्दोध !
- चोरटी वाळू विकत घेणाराही गोत्यात !
- लग्नाच्या वरातीत बेधुंद नाचला, पाणी पिताच जीवाला मुकला !
- सोलापूर जिल्ह्यात मागेल त्या शेतकऱ्यास मिळणार कर्ज !
- उजनी धरणातून कालव्यात सोडणार पाणी !
- अजितदादा पवार म्हणाले, 'नाही तर ते काय घंटा देणार '?
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !