मंगळवेढा : बांधकामाच्या ठिकाणी चोरटी वाळू देणारी वाहने पोलिसांना पाहून पळून गेली पण चोरीची वाळू विकत घेवून बांधकाम करीत असलेला बांधकाम मालक देखील ( Mangalawedha Crime) गोत्यात आला आहे.
वाळू चोरी हा प्रकार आता सगळीकडेच वाढीला लागलेला असून प्रचंड पैसा मिळत असल्याने वाट्टेल तसे धाडस करण्याचे आणि होणारे परिणाम स्वीकारण्याची या वाळू तस्करांची तयारी असल्याचे अनेक घटनावरून दिसते. प्रशासन वाळू चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी बरेच काही उपाय करते तर प्रशासनातील काही जणांची मिलीभगत असल्याची चर्चा समाजात खुलेपणाने सुरु असते. वाळू चोर सापडत नाहीत असे देखील प्रशासनाचे म्हणणे असते पण अनेक बांधकामावर उघड्या जागेत वाळूचे ढीग दिसत असतात. बांधकाम मालकाच्या मुसक्या आवळल्या तरी वाळू चोरांचे मुखवटे गळून पडतील, परंतु तसे होताना दिसत नाही. (Sand theft in Solapur district)मंगळवेढा तालुक्यातील एक बांधकाम मालक मात्र चोरट्या वाळूमुळे गोत्यात आला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील शेलेवाडी येथे दतात्रय माली यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी रात्रीच्या साडे बारा वाजता दोन टमटम वाळू खाली करीत होत्या आणि नेमके याच वेळेस मंगळवेढा पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्तीवर होते. वाळू खाली केली जात असल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला आणि चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांचीही नजर पोलिसांवर गेली. पोलीस आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच वाहनचालकांनी आपली वाहने घेवून तेथून धूम ठोकली. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण पळून जाण्यात ते यशस्वी ठरले.
कुठलीही चोरीची वस्तू विकत घेणारा तेवढाच जबाबदार असतो आणि पोलीस अशा व्यक्तीवर गुन्हे दाखल करीत असतात. कुठल्याही चोरीला आणि चोरी करणाऱ्यास मदत करणे हा देखील तितकाच गंभीर गुन्हा समाजला जातो. असे असताना विविध बांधकामावर वाळूचे ढीग उघड्यावर पडलेले असतात पण त्या वाळूकडे प्रशासनाचे लक्ष जात नाही आणि तेथे कुणी हटकतानाही दिसत नाहीत . बांधकामाच्या ठिकाणी उघड्यावर पडलेले वाळूचे डिग पाहून चौकशी केली तरी वाळू चोरीची सगळी साखळी अत्यंत सहज समोर येवू शकते पण हे घडताना कधीच दिसत नाही.
पोलीस दत्तात्रय माळी यांच्या बांधकामावर पोहोचले तेंव्हा त्यांना तेथे वाळूचा ढीग दिसला. पोलिसांनी माळी यांना वाळूच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगत दोन टमटममधून ही वाळू आणण्यात आली असल्याचे पोलिसांना सांगितले. आपले स्वत:च्या घराचे बांधकाम सुरु असून आपण दहिवडी येथील बिरा बनसोडे याला फोन करून वाळू आणण्यास सांगितले होते असे त्यांनी पोलिसांना सांगितले. बांधकामाच्या ठिकाणी दीड ब्रास वाळूचा ढीग आढळून आला आहे. चोरटी वाळू विकत घेणारे दातात्राय माळी, दहिवडी येथील बिरा उर्फ सोहन बनसोडे आणि वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे चालक मालक यांच्याविरोधात मंगळवेढा पोलिसांनी (Mangalwedha police take action against sand thieves) गुन्हा दाखल केला आहे.
हे देखील वाचा :
- सोलापूर जिल्ह्यात मागेल त्या शेतकऱ्यास मिळणार कर्ज !
- उजनी धरणातून कालव्यात सोडणार पाणी !
- सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरसह सहा तालुके कोरोनामुक्त !
- अजितदादा पवार म्हणाले, 'नाही तर ते काय घंटा देणार '?
- इशारा ! पुढील पाच दिवसात उष्णतेची लाट !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !