सोलापूर : पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असून सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ( Solapur Court) दिलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे.
चारित्र्याच्या संशयाने अक्कलकोट तालुक्यातील कुमठा येथील इक्बाल मेहबूब मोमीन याने पत्नीला जाळून मारल्याचा आरोप होता आणि त्याचा हा गुन्हा सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) सुनावली होती. १२ मे २०१५ रोजी इक्बाल दारू पिवून घरी आला आणि आपली पत्नी फातिमा हिच्या अंगावर चिमणीतील रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. चारित्र्यावर संशय घेत त्याने 'तुला जिवंत ठेवणार नाही' असे म्हणत फातिमाला पेटवून दिले. या घटनेत फातिमा गंभीर जखमी झाली होती आणि २३ मे रोजी तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान उपचार घेत असताना १३ मे रोजीच फातिमाने दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात इक्बाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा खटला सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु झाला आणि सुनावणी होऊन न्यायालयाने इक्बाल मोमीन या जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निकालाच्या विरोधात इक्बाल याने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलातील सुनावणीवेळी इक्बालचे वकील रितेश थोबडे यांनी युक्तिवाद केला. मृत्युपूर्व जबाबात असलेल्या विसंगती त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या सदर जबाब हा विश्वासार्ह नसल्याचे सांगत त्यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील काही निवाडे न्यायालयात सादर केले. हा युक्तिवाद ग्राह्य धरीत न्यायालयाने इक्बाल मोमीन याची जन्मठेपेची शिक्षा रद्द करीत (High court Canceled life sentence)त्याची निर्दोष मुक्तता केली आहे.
हे देखील वाचा :
- सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची लेक बनली फौजदार !
- चोरटी वाळू विकत घेणाराही गोत्यात !
- लग्नाच्या वरातीत बेधुंद नाचला, पाणी पिताच जीवाला मुकला !
- सोलापूर जिल्ह्यात मागेल त्या शेतकऱ्यास मिळणार कर्ज !
- उजनी धरणातून कालव्यात सोडणार पाणी !
- अजितदादा पवार म्हणाले, 'नाही तर ते काय घंटा देणार '?
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !