BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२२

ठोक देंगे ! शिवसेनेच्या आमदारांना मारण्याची धमकी !

 



रत्नागिरी : 'रिफायनरी का काम मत रोकना, नही तो ठोक देंगे ' अशी धमकी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना आली असल्याने कोकणात एकच खळबळ उडाली आहे.  


अलीकडे आमदार, खासदार यांनाच अधिक धमक्या येत असताना आणि नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा आणि त्यांच्या फोन क्रमांकाचा वापर करून एक बिल्डरला वीस लाखाची खंडणी मागितल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. आता शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनाच जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राज्यात शिवसेना सत्तेत आहे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर आहेत. असे असताना शिवसेनेच्याच एका आमदाराला थेट मारून टाकण्याची धमकी दिली गेली आहे. रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पाला आमदार राजन साळवी यांनी विरोध केला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आली आहे. आमदार साळवी यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आमदार साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला देखील मारण्याची धमकी दिल्याने कोकणात खळबळ उडाली आहे.


सदर धमकी ही एका मोबाईलवरून आली असून धमकीचा हा फोन दोन वेळा आला आहे. 'रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जायेगा, चल, फोन रख' अशी धमकी देऊन अज्ञात व्यक्तीने फोन बंद केला. या फोन नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा असाच फोन आला आणि 'रिफायनरी मे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना नही तो तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे' अशी धमकी दुसऱ्यांदा आलेल्या फोनवरून देण्यात आली. धमकीचा दुसरा फोन आल्यावर मात्र आमदार साळवी यांनी ही धमकी गंभीरपणे घेतली आणि रत्नागिरी पोलिसात तक्रार दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. शिवसेनेच्या आमदारांना अशा प्रकराची धमकी आल्याने कार्यकर्ते अस्वस्थ असून रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.   


वाचा : कोरोना लसीमुळे लहान मुलीचा मृत्यू !


एका दिवसात एकट्याने तोडला सोळा टन ऊस !








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !