सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एप्रिलपासून मागेल त्या शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जाणार असून खरीप आणि रब्बी हंगामासाठी ४ हजार २०० कोटीं कर्जाचे वाटप ( Loans for farmers) केले जाणार आहे.
सोलापूर जिल्हा हा रब्बी पिक घेणारा जिल्हा म्हणून ओळख असली तरी गेल्या काही वर्षांपासून खरीप पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे खरीपासाठी देखील मोठ्या प्रमाणात पीक कर्जाची मागणी केली जाते त्यामुळे रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामासाठी यावर्षी पीक कर्जाचे समान वाटप करण्यात येणार आहे. रब्बी हंगामासाठी पन्नास टक्के आणि खरीप हंगामासाठी पन्नास टक्के अशा पद्धतीने पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. ( Farmers will get crop loan from April) सोलापूर जिल्ह्यात १ एप्रिल पासून बँकेमार्फत या कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र मोठे असून साखर कारखान्यांची संख्यादेखील सर्वाधिक आहे तरीही जिल्ह्यात खरीप क्षेत्र वाढत असल्याने खरीपासाठी देखील पीक कर्ज देण्यात येणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच अन्य राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकाच्या माध्यमातून साडे तीन हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात येत असते परंतु कर्जाची मागणी वाढू लागली असून नाबार्डने केलेल्या सर्व्हेच्या अनुसार ४ हजार २०० कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. येत्या १ एप्रिल पासून हे कर्ज वाटप केले जाणार असून रब्बी आणि खरीप हंगामासाठी मागेल त्या शेतकऱ्यास हे कर्ज दिले जाणार आहे परंतु त्यासाठी काही अटी आणि शर्थीचे पालन करावे लागणार आहे. सिबिल स्कोअर किमान ६५० पेक्षा अधिक असलेल्या शेतकऱ्यास सहजपणे कर्ज मिळू शकणार आहे.
कर्ज घेऊ इच्छिणारा शेतकरी कोणत्याही वित्तीय संस्थेचा अथवा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा हा महत्वाचा निकष या कर्जासाठी निश्चित केलेला आहे. प्रत्येक पिकासाठी शेतकऱ्यास यावर्षी वाढीव कर्ज दिले जाणार आहे, याबाबतचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेला पाठविण्यात आलेला आहे. त्यानंतर कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्यानुसारच पीक कर्ज वितरीत करण्यात येणार आहे. १ एप्रिल पासून पीक कर्जाचे वाटप करण्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून जिल्हाधिकारी (Farmers of Solapur District) यांची मान्यता मिळताच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा :
- उजनी धरणातून कालव्यात सोडणार पाणी !
- सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरसह सहा तालुके कोरोनामुक्त !
- अजितदादा पवार म्हणाले, 'नाही तर ते काय घंटा देणार '?
- इशारा ! पुढील पाच दिवसात उष्णतेची लाट !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !