मोहोळ : पंढरपूर तालुक्यातील तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येची हळहळ अजूनही व्यक्त होत असताना सोलापूर जिल्ह्यात आणखी एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या (Suicide of a young farmer) केल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
शेतकरी कायम अडचणीत असताना नवनवी संकटे त्याच्यावर येत असल्याचे शेतकरी अस्वस्थ असतो. अपुरी वीज, निसर्गाचे संकट, बँकांची कर्ज, नकली खते, बियाणे अशा अनेक अडचणीत शेतकरी गुरफटलेला असतो त्यातच शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही त्यामुळे शेती करणे शेतकऱ्यास अडचणीचे आणि संकटाचे ठरू लागले आहे. विदर्भ, मराठवाडा परिसरात असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत पण सोलापूर जिल्ह्यात अशी परिस्थिती नव्हती परंतु अलीकडे सोलापूर जिल्ह्यातही ( Mohol, Solapur) शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत ही चिंताजनक बाब आहे.
पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती आणि तत्पूर्वी त्याने एक व्हिडीओ देखील चित्रित केला होता. शेतीबाबत आणि शासन धोरणाबाबत त्याने नाराजी व्यक्त करीत आत्महत्या केली होती आणि हा विषय विधानसभेपर्यंत चर्चिला गेला होता. सोलापूर जिल्ह्यात आणि विशेषत: पंढरपूर तालुक्यात या घटनेने मोठा धक्का बसला होता. सुरज जाधव याची दुर्दैवी आत्महत्या अजूनही शेतकरी विसरले नाहीत. या दुर्दैवी घटनेची चर्चा अजून सुरु असतानाच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील एका तरुण शेतकऱ्याने आज आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
शेतात पैसे खर्च करूनही त्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याच्या निराशेतून अवघ्या २८ वर्षे वयाच्या मनोज राजाराम गायकवाड या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. मोहोळ येथील गायकवाड वस्ती येथे त्याने आज लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. या घटनेने मोहोळ तालुका हादरून गेला आहे. मनोज गायकवाड हा आपल्या आजी आजोबांच्या सोबत गायकवाड वस्ती येथे राहत होता. त्याने शेतात मोठा खर्च केला होता परंतु त्या बदल्यात शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. शेतात घातलेली रक्कम देखील निघत नव्हती त्यामुळे मनोज हा कायम तणावात आणि निराशेत होता.
शेतात पैसा खर्च करूनही हाती काहीच येत नसल्याने मनोज हा निराश होता आणि या नैराश्यातून त्याने आज टोकाचे पाउल उचलले. गळ्यातील पंचा वापरून त्याने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबत राजाराम पांडुरंग गायकवाड ( गायकवाड वस्ती, नरखेड रोड, मोहोळ) यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली आहे.(Suicide of a young farmer due to unaffordability of agriculture) या घटनेने मोहोळ तालुक्यात हळहळ व्यक्ती होत असून तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडू लागल्याचे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
हे देखील वाचा :
- सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्यात शाळा, वेळेत मात्र बदल !
- शाळेतील खिचडीत पालीचे तुकडे, विद्यार्थ्यांना विषबाधा !
- हप्त्यासाठी सलून व्यावसायिकावर खुनी हल्ला !
- सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची लेक बनली फौजदार !
- बायकोला जाळले, जन्मठेप झाली पण उच्च न्यायालयात निर्दोध !
- चोरटी वाळू विकत घेणाराही गोत्यात !
- लग्नाच्या वरातीत बेधुंद नाचला, पाणी पिताच जीवाला मुकला !
- सोलापूर जिल्ह्यात मागेल त्या शेतकऱ्यास मिळणार कर्ज !
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !