करमाळा : लहानशा गावातील एका वस्तीवर राहणारी शेतकऱ्याची लेक फौजदार झाली असून कठोर परिश्रमाच्या जोरावर यश कसे खेचून आणता येते हेच शेतकऱ्याच्या या लेकीने ( Farmer's daughter) दाखवून दिले आहे आणि तिचे कौतुक होऊ लागले आहे.
मोठ्या शहरातच टॅलेंट असतं आणि तिथली मुलंच काही भव्य दिव्या घडवतात असा अनेकांचा गैरसमज असतो. खेड्यातील अनेक पोरांनी आपल्या यशाची चमक अनेकदा दाखवून दिली आहे. कसलीही अनुकूलता नसताना प्रतीकूल परिस्थितीशी झगडत खेड्यातील तरुण मुले यशाला गवसणी घालताना दिसतात. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव या छोट्याशा गावातील सारिका नारायण मारकड या शेतकऱ्याच्या लेकीने असेच यश मिळवले असून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदावर तिची निवड झाली आहे. (The farmer's daughter became a police sub-inspector) शेतकऱ्याची वस्तीवर राहणारी लेक फौजदार झाल्याने शेतकऱ्याची छाती अभिमानाने फुगली आहे.
कुगाव गावाच्या शिवारात असलेल्या शेतातील वस्तीवर मारकड कुटुंब राहते. वस्तीवरून तिने जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेतले आणि शेजारीच असलेल्या चिखलठाण येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून पुढलं शिक्षण घेतले. वाणिज्य शाखेत शिकत असतानाच सारिकाला डी एड करण्याची संधी मिळाली आणि तिने डी एड करण्याला प्राधान्य दिले. कुठेतरी शिक्षिका होऊ पाहणाऱ्या सारिकाला तिच्या मावशीने प्रशासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा दिली आणि त्या दिशेने सारिकाने आपला प्रवास सुरु केला आणि कठोर परिश्रम घेत तिने आपल्या ध्येयापर्यंतचा प्रवास पूर्ण केला.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सारिका कोल्हापूरला पोहोचली आणि याचवेळी तिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी ए करण्याचा निश्चय केला. एकीकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि दुसरीकडे बी ए चा अभ्यास अशी कसरत करीत तिने राज्यशास्त्र विषयातून बी ए ची पदवी देखील संपादन केली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच होता पण किरकोळ मार्कानी तिला अपयश येत राहिले पण ती खचून गेली नाही तर उलट जोमाने परिश्रम करीत राहिली. २०१८ च्या स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळणार अशी तिला खात्री होती पण तेथेही अपयशच आले. आता मात्र सारिका काहीशी खचून गेली होती. सतत यश हुलकावणी देत असल्यामुळे निराश देखील झाली होती पण तिने पळ काढला नाही. पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. कोल्हापूर सोडून ती पुण्याला गेली आणि अखेर यशाचा झेंडा फडकावला ! लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत अखेर तिने ध्येय गाठले आणि पोलीस उपनिरीक्षक पदावर पोहोचली.
विविध अडचणींचा सामना करीत आणि आपल्या अपयशावर देखील मात करीत तिने जिद्द सोडली नाही. जिद्द असली की यश कवेत आणता येते हेच या ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या लेकीने दाखवून दिले आणि तमाम शेतकऱ्यांना अभिमान वाटेल असे कर्तृत्व सिद्ध केले. (Proud of the farmers) सारिकाच्या या यशाचे कौतुक तर होतच आहे पण तिच्या जिद्दीला देखील सलाम केला जात आहे.
हे देखील वाचा :
- चोरटी वाळू विकत घेणाराही गोत्यात !
- लग्नाच्या वरातीत बेधुंद नाचला, पाणी पिताच जीवाला मुकला !
- सोलापूर जिल्ह्यात मागेल त्या शेतकऱ्यास मिळणार कर्ज !
- उजनी धरणातून कालव्यात सोडणार पाणी !
- अजितदादा पवार म्हणाले, 'नाही तर ते काय घंटा देणार '?
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !