BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० जाने, २०२४

पंढरपूरच्या त्या दोन अधिकाऱ्यांना अटक, तिसरा पळाला ! पाच लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप !



शोध न्यूज : तोतया अधिकारी बनून गंडा घालू पाहणाऱ्या पंढरपूर येथील दोघांना चोपडा येथे बेड्या ठोकण्यात आल्या असून यातील एक निलंबित पोलीस आहे दोघांना अटक करण्यात आली असली तरी तिसरा भामटा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.


अलीकडे फसवणूक करण्याचे आणि कुणाला तरी गंडा घालून पैसा मिळविण्याचे अनेक उद्योग समोर येत असतात. लोकांची फसवणूक करून लाखो रुपयांची कमाई करण्यात येत असते पण या भामट्याचे बिंग फुटल्याशिवाय राहत नसते. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील दोन भामटे अशाच प्रकारे कमाई करायला गेले पण चोपडा येथे त्याच्या हातात बेड्या पडल्या आहेत. पैसा मिळविण्यासाठी त्यांनी केलेली युक्ती त्यांच्या अंगलट आली आणि त्यांचा सगळा डाव फसला गेला. आपण अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी असल्याचा बहाणा त्यांनी केला आणि गुटखा विक्रेत्याला त्यांनी तब्बल पाच लाखांची खंडणी मागितली. पण पाच लाखांऐवजी त्यांच्या हातात बेड्या पडल्या. यात पंढरपूर येथील एक पोलीस आहे. दोघांना पकडले गेले असून तिसरा पळून गेला आहे. त्याच्याही हातात लवकरच बेड्या पडणार आहेत.


पंढरपूर येथील निलंबित पोलीस कर्मचारी री राहुल शिवाजी देवकाते , पंढरपूर शहरातील गोविंदपुरा येथील विनायक सुरेश चवरे आणि अन्य एक जण यांनी पैसे मिळविण्यासाठी एक वेगळा फंडा अवलंबला. चोपडा येथील जितेंद्र गोपाल महाजन आणि सचिन अरुण पाटील यांना, आपण अन्न व औषध प्रशासन अधिकारी असल्याचे सांगितले आणि त्यांच्याकडून तब्बल पाच लाखांची खंडणी मागितली.  दरम्यान, चोपडा शहरात जयहिंद कॉलनी परिसरात तीन तोतया अधिकारी त्यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांनी पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिसांनी लगेच तिकडे धाव घेतली असता तिघे संशयास्पद रीतीने फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेत दोघांना पोलीस ठाण्यात आणले.  तिघातील एक जण पसार झाला आहे. त्यांच्याकडे असलेल्या चार चाकी गाडीचा क्रमांक देखील बनावट असल्याचे आढळून आले आहे. 


पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आरोपींचा प्रयत्न सुरु होता. या आरोपींवर या आधी देखील काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. लोहियानगर, चोपडा येथील जितेंद्र गोपाल महाजन यांच्या फिर्यादीवरून चोपडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे (Pandharpur fake officer arrested) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तरडी (येथील नातेवाइकांनाही या तोतया अधिकाऱ्यांनी एक लाखाचा चुना लावल्याची माहिती पोलिसांनी दिली. पंढरपूर येथील या तोतया अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यात जाऊन हा तोतयेगिरीचा प्रकार केल्याबाबत  चर्चा पंढरपूर परिसरात देखील सुरु झाली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !