शोध न्यूज : आमची ऑर्डर आण आधी, हॉटेल चालवता का काय ? म्हणत एकाने गावठी पिस्तुल दाखवत थरार केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेची चर्चा जिल्हाभर सुरु झाली आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना अनेकजण झिंगलेले असतात, अशावेळी काही अनुचित घटना समोर येत असतात. परतू त्या आधीच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे वेगळाच धिंगाणा झाल्याचे समोर आले आहे हॉटेलमध्ये दिलेली जेवणाची ऑर्डर लवकर देण्यासाठी चक्क गावठी पिस्तुलाचा धाक दाखविण्यात आला. अकलूज येथे एका हॉटेलात शंकर खंदारे हा आपला मित्र किरण भोसले यांच्यासह दाखल झाला, त्याच्यासोबत आणखी दोघेजण होते. हे सगळे हॉटेलमध्ये आल्यानंतर एका टेबलावर बसले आणि त्यांनी दोन चिकन थाळी ची ओरडेर दिली. रात्रीची वेळ असल्यामुळे या हॉटेलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती त्यामुळे प्रत्येक ग्राहकाच्या अपेक्षेनुसार वेळेत जेवण देणे हॉटेल चालकाला शक्य होत नव्हते. शंकर खंदारे आणि त्याच्या साथीदाराला देखील त्यांची ऑर्डर मिळण्यास उशीर होत होता आणि याच कारणावरून पुढील मोठी घटना घडली.
शंकर खंदारे याने दिलेली ऑर्डर देण्यास वेळ लागत असल्याने तो चिडला आणि हॉटेलमध्ये गोंधळ घालू लागला. तुम्ही हॉटेल चालवता का काय ? असे म्हणत त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तेथून या वादाची सुरुवात झाली. त्यांनी हॉटेल मालक आणि हॉटेलचा वेटर याना शिवीगाळ केली तसेच तुमच्याकडे बघतो, असे म्हणत दमदाटी देखील करू लागले. हॉटेल मालकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. 'ग्राहकांची गर्दी असल्यामुळे थोडा वेळ लागणार आहे, तुम्हाला घाई असेल तर तुम्ही दुसरीकडे जा पण येथे शिवीगाळ करू नका' असे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. या समजावण्याचा कसलाच उपयोग झाला नाही. पुन्हा दहा मिनिटाने तिसऱ्या वेळी शंकर खंदारे हा किचनकडे जाऊन शिव्या देऊ लागल्याने मॅनेजर मनोज घाडगे हा तेथे आला. यावेळी शंकर खंदारेने सोबत आणलेले गावठी पिस्टल दाखवले. जेवणाची ऑर्डर वेळेत मिळत नाही म्हणून चक्क गावठी पिस्तूल बाहेर निघाले होते. यामुळे अन्य ग्राहक देखील घाबरून गेले. मॅनेजर मनोज घाडगे याने त्यास पाठीमागून मिठी मारून त्याला धरले आणि त्याचे हातात असलेली गावठी पिस्टल काढून घेऊन कामगार विनोद काटेच्या हातात दिली.
त्याच्या हातातील पिस्तूल काढून घेण्यात यश आल्याने हॉटेलमधील अन्य ग्राहकांच्या देखील जिवंत जीव आला पण पाठीमागून मिठी मारल्याने, शंकर हा मिठीतुन सुटण्यासाठी प्रयत्न करू लागला. हिसके देत आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत असताना, पाण्याच्या टाकीला अडखळून तो खाली पडला. या सगळ्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अकलूज येथील महर्षी वसाहतीत राहणाऱ्या शंकर सुधाकर खंदारे याला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शंकर खंदारे याला अकलूज पोलिसांनी अटक केली, या घटनेने काही काळ भरल्या हॉटेलमध्ये एक वेगळाच थरार पाहायला मिळाला होता. जेवणाची ऑर्डर वेळेत न मिळाल्याच्या कारणावरून चक्क गावठी पिस्तुलाचा धाक दाखविला गेला होता त्यामुळे इतर ग्राहक देखील घाबरून गेले होते.
अलीकडेच वेळापूर येथे एक गावठी पिस्तूल आढळून आले होते त्यानंतर आता अकलूज येथील हॉटेलमध्ये हा थरार समोर आला आहे. साहजिकच यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून. ३१ डिसेंबरच्या आधीच ही घटना घडली आहे, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक देखील चिंतेत आहेत.(Thrill of illegal pistol in hotel) प्रसंगावधान राखून खंदारे याच्या हातातील गावठी पिस्तूल घेण्यात यश मिळाले त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे पण हॉटेलमध्ये जाऊ इच्छित असलेल्या ग्राहकांत मात्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !