BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ मे, २०२२

जमिनीची परस्पर विक्री, सरपंचासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

 




मंगळवेढा : गहाणखत करून दिलेल्या जमिनीची परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणी कर्जदार, जामीनदार, खरेदी करणारा आणि साक्षीदार असलेल्या सरपंच, शिक्षिकेसह १४ जणांच्या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Mangalawedha Crime) करण्यात आला आहे. 


मंगळवेढा येथील रतनचंद शहा बँकेचे वसुली अधिकारी अंकुश गंगाधर जाधव (नागणेवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार रतनचंद शहा बँकेस गहाणखत करून दिलेल्या जमिनीची परस्पर विक्री केल्याचे  हे प्रकरण आहे. गंगासागर बसवेश्वर पाटील आणि त्यांचा मयत असलेला भाऊ शैलेश बसवेश्वर पाटील यांनी रतनचंद शहा बँकेकडून तीन लाखांचे कर्ज २०११ मध्ये घेतले होते आणि यासाठी मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील ८ हेक्टर १३.१० एवढी शेत जमीन दिली होती. घेतलेल्या कर्जाची नोंद सात बारा उताऱ्यावर करण्यात आलेली होती. सदर नोंद कायम ठेवत २०१४ साली ६ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले आणि काही नोंदी कायम ठेवत आणखी वाढीव कर्ज घेतली गेली होती. यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची देखील पूर्तता केली गेली होती. शशिकांत मोतीलाल नाझरकर आणि पांडुरंग शिवाजी पडवळे हे जामीन राहिलेले होते. 


सदर सर्व प्रकरण कागदावर असताना देखील कर्जदाराने बँकेला काही माहिती कळू न देता जमीन मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर येथील संजय नाना बिचुकले यांनी खरेदी केली. या खरेदीस हाजापूर येथील  धनाजी नाना बिचुकले आणि गणेशवाडी येथील सिद्धेश्वर कदम हे साक्षीदार आहेत. बँकेकडे जमीन तारण असताना देखील सदर जमीन खरेदी करण्यात आली आणि जमीन तारणाची नोंद असताना देखील साक्षीदार म्हणून त्यांनी सह्या केल्या. त्यानंतर खोमनाळ येथील विजया शिवाजी पाटील यांनी १.६१ आर खरेदी केली. आणि त्यासाठी साक्षीदार म्हणून खोमनाळ येथील सुरज चंदू सुतार यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या. खोमनाळ येथील शिवाजी पाटील यांनीही शैलेश पाटील यांच्याकडून ८४.०५ आर जमीन खरेदी केली आहे.  सलीम इनामदार, रोहित इंगळे यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या आहेत. 


यानंतर देखील त्यांनीच ०.४१ आर जमीन खरेदी केली आहे. बँकेचे कर्ज सदर जमिनीवर आहे तरीही खोमनाळ येथील भीमराव दगडू शिंदे  आणि डोंगरगाव येथील ईश्वर कुंडलिक शिंदे यांनी वेकायादेशीर कागदपत्रे तयार करून जमीन खरेदी विक्रीचे दस्त करण्यात मदत केली आणि या जमीनिच्य विक्रीनंतर आलेले पैसे बँकेच्या खात्यात भरले नाहीत. (Mutual sale of mortgaged land) त्यामुळे कर्जदाराकडे फेब्रुवारी २२ अखेर १३ लाख ३० हजार ६९६ रुपये एवढी रक्कम राहिली म्हणून फिर्याद देण्यात आली. 


१४ जणांच्या विरुद्ध गुन्हा 
कर्जदार गंगासागर पाटील, मयत शैलेश पाटील जामीनदार शशिकांत नाझरकर, पांडुरंग पडवळे, खरेदीदार संजय बिचुकले, शिवाजी पाटील, विजया शिवाजी पाटील, साक्षीदार धनाजी बिचुकले, सिद्धेश्वर कदम, सुरज सुतार, रोहित इंगळे, सलीम इनामंदार, दस्त करणारे भीमराव शिंदे, ईश्वर शिंदे या १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  
प्रचंड खळबळ ! 
बँक बोजा असताना आणि तशा प्रकारच्या नोंदी फेरफार उताऱ्यावर असताना गहाणखत केलेल्या जमिनीची परस्पर विक्री केली म्हणून कर्जदार, जामीनदार, खरेदीदार आणि साक्षीदार यांच्यासह खरेदी विक्री करणाऱ्या एजंटांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. या एकूण प्रकाराने मंगळवेढा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. 


हे जरूर वाचा : >>> 

खालील बातमीला टच करा !

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !