BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ मार्च, २०२२

शालेय पोषण आहारात पाल, चाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा !


उस्मानाबाद : शालेय पोषण आहाराच्या खिचडीत पाल आढळून  आली असून ही खिचडी खाल्लेल्या चाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा ( Poisoning of students ) झाल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे.


शालेय विद्यार्थ्यांना एका विशिष्ठ हेतूने पोषण आहार ( Shaley poshan aahar) सुरु करण्यात आला आहे पण हा पोषण आहार विद्यार्थ्यांना देताना निघा राखली जात नसल्याचे अनेक तक्रारी यापूर्वी आलेल्या आहेत. आता मात्र शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या या खिचडीत पालीचे अवशेष आढळून आले आणि दरम्यान ही खिचडी खालेल्या ४० विद्यार्थ्यांना विषबाधा देखील झाल्याचे समोर आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराच्या खिचडीत चक्क पालीचे तुकडे आढळून आले आहेत.


उमरगा तालुक्यातील पेठ सांगवी या गावातील जिल्हा परिषद शाळेत ( Z. P. School) आज ही धक्कादायक घटना घडली आहे. शालेय पोषण आहारात तयार करण्यात आलेली ही खिचडी शाळेतील मुलांनी आपल्या डब्यात भरून घरी नेली होती. यातील एका मुलाच्या डब्यात पालीचे मुंडके आढळून आले तर अन्य एका मुलाच्या डब्यात पालीच्या शरीराचा भाग आढळून आला. हा प्रकार पाहून पालकांच्या अंगावर काटा आला आणि त्यांनी तातडीने शाळेत धाव घेतली. ( Poisoning of students from school nutrition ) खिचडीत पालीचे तुकडे असल्याची माहिती त्यांनी शिक्षकांना दिली. हे ऐकून शिक्षकांचीही भंबेरी उडाली. 


४० विद्यार्थ्यांना विषबाधा 

शिक्षकांच्या पर्यंत ही धक्कादायक माहिती पोहोचली परंतु तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना याच खिचडीचे वाटप करण्यात आले होते आणि यातील अनेक विद्यार्थ्यांना त्रास देखील होऊ लागला होता.  एकूण चाळीस विद्यार्थ्यांना या खिचडीमुळे विषबाधा झाली आणि उलटी, मळमळ, चक्कर येणे, डोकेदुखी अशा प्रकारचा त्रास या विद्यार्थ्यांना होत राहिला.


२४८ जणांना वाटप 

पालीचे तुकडे असलेले ही खिचडी एकूण २४८ विद्यार्थ्यांना वाटण्यात आली होती. यातील अनेक पालकांनी शाळेत धाव घेतली. विषबाधा झालेल्या १८ विद्यार्थ्यांना तातडीने उमरगा येथील रुग्णालयात रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविण्यात आले तर कमी प्रमाणात त्रास असलेल्या विद्यार्थ्यांना जागेवरच उपचार देण्यात आले. नाईचाकूर येथील डॉक्टरांची एक टीम बोलावण्यात आली आणि शाळेतच उपचार देण्यात आले. जादा प्रमाणात खिचडी शिजविण्यात आल्याने पालीचे विष अधिक पसरले नसल्याचा अंदाज डॉक्टरनी व्यक्त केला आहे.  


जिल्हाभर खळबळ 

शालेय पोषण आहारात पालीचे तुकडे आढळल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची बातमी प्रारंभी उमरगा तालुक्यात आणि नंतर जिल्हाभर पसरली. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक यांना ही माहिती मिळाली तेंव्हा प्रयेकाच्या काळजाचा ठोका चुकला. शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी घटनेची माहिती मिळताच शाळेला भेट दिली आणि पाहणी केली. विद्यार्थी आणि पालकांची विचारपूस करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याबाबत सूचना दिल्या. 



हे देखील वाचा :

अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !     




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !