BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ डिसें, २०२३

बनावट सही, बनावट प्रतिज्ञापत्र, नायब तहसीलदारांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश !



शोध न्यूज : बनावट सही, बनावट प्रतिज्ञापत्र असा मोठा घोटाळा चव्हाट्यावर आला असून नायब तहसीलदार यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायलयाने दिल्याने सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


महसूल विभागातील अनागोंदीची नेहमीच चर्चा होत असते तसेच 'जे नसे ललाटी ते लिही तलाठी' अशी एक म्हण देखील प्रचलित आहे. अर्थात याचा प्रत्यय सामान्य माणसाना आपले जीवन जगत असताना अनेकदा येत असतो. आता मात्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक प्रकरण नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांच्यावर चांगलेच शेकले आहे. जमिनीच्या विषयी राज्यात महाराष्ट्र महसूल अधिनियम आहे आणि या नियमांत महसूल अधिकारी यांचे अधिकार निश्चित करण्यात आले आहेत परंतु,जमिनीचे वाटप करण्याचे कसलेही आधिकार नसताना,  नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांनी संगनमत करून एकास जमिनीचे वाटप केले आणि सातबारा हक्कपत्रकी बेकायदेशीर नोंद घेतली. हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर पोहोचले आहे.


लिंबराज ढगे यांच्या मालकीची शहर नगरपरिषद हद्दीतील जमीन गट नं. ६३८ आहे. जागेबाबत बार्शी न्यायालयात वाटपाचा दावा प्रलंबित आहे. जमीन वाटप प्रकरणी न्यायालयात दावा असतानाही, शिवाय लिंबराज ढगे यांची कसलीही संमती न घेता त्यांची बनावट सही करून आणि बनावट प्रतिज्ञापत्र करून, बनावट व्यक्ती उभी करण्यात आली.  लिंबराज ढगे यांची अथवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती यांच्या मान्यतेशिवाय जमीनीचे वाटप करण्यात आले आणि   सातबारा हक्कपत्रकी बेकायदा नोंदी घेतल्या आहेत विशेष बाब म्हणजे,नायब तहसीलदार, मंडल अधिकारी यांना वाटप करण्याचे अधिकार नसताना त्यांनी हे कृत्य केले आहे .लिंबराज ढगे यांनी याबाबत तक्रार देखील केली. बेकायदा नोंद रद्द व्हावी, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई व्हावीअशी तक्रार महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करूनही कोणतीही कारवाई करण्यात अली नाही त्यामुळे ढगे यांनी फौजदारी न्यायालयात धाव घेतली. दाखल केलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून बार्शी शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


सदर प्रकरणात न्यायलयाने तीन शासकीय अधिकाऱ्यांसह एकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, रघुनाथ ढग याच्यासह, नायब तहसीलदार माजीद काझी, मंडल अधिकरी उमेश डोईफोडे, तलाठी महेश गरड यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (Fake signature, affidavit, order to file a case) लिंबराज ढगे यांनी एप्रिल २०२२ मध्ये बार्शी न्यायालयात खासगी फौजदारी फिर्याद दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या आदेशामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, सोलापूर जिल्ह्यात याची चर्चा सुरु झाली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !