BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ नोव्हें, २०२३

सात बारा उतारा आता कायमचा बंद !


शोध न्यूज : सात बारा उतारा आता कायमचा बंद होत असून पावणे सात लाख उतारे बंद करण्यात आले असून उर्वरित उतारे बंद करण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे.


मिळकतीचे सात बारा उतारे हे आजवर अत्यंत महत्वाचे ठरले आहेत पण आता हे उतारे संपुष्टात येत असून ही प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे. पावणे सात लाख उतारे बंद करण्यात आले असून, उरलेले ६३ हजार उतारे बंद करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे उताऱ्याची जागा आता मिळकत पत्रिका घेणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास ४५ हजार गावांपैकी चार हजार पाचशे गावांचे शहरीकरण झाले आहे, त्यामुळे या गावातील जवळपास साडे सात लाख सात बारा उतारे संपुष्टात आणून, या उताऱ्यांची मिळकत पत्रिका तयार होत आहे. पुणे विभागातील सुमारे पावणे दोन लाख सात बारा उतारे संपुष्टात येणार असून हा आकडा सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. सात बारा उतारे देण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागाने बंद केली आहे. सदरची प्रक्रिया ही ऑनलाईन नसल्याने, अशा प्रकारची मिळकत पत्रिका मिळण्यास आता नव्या वर्षात सुरुवात होणार आहे. 


अलीकडे ग्रामीण भागांचे देखील वेगाने शहरीकरण होऊ लागले आहे. त्यामुळे, महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम १२२ नुसार अधिसूचनेप्रमाणे, शहरी भागाचा सर्व्हे क्रमांक निश्चित करण्यात येत असतो, नागपूर. नाशिक, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक शहरांचा लागून असलेल्या ग्रामीण भागांचे शहरीकरण होत असून ही प्रक्रिया वेगाने सुरु आहे. त्यामुळे सर्व्हे क्रमाक निश्चित करून तेथील सात बारा उतारे संपुष्टात येत आहेत तर त्याजागी  प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. (Property card will take the place of sat bara utara)  हे कार्ड भूमी अभिलेख विभागाकडून तयार करण्यात येते. त्यानुसार जवळपास सात लाख ३८ हजार सात बारा उतारे बंद करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सात बारा उताऱ्याची जागा आता  प्रॉपर्टी कार्ड घेणार आहे.  या प्रक्रियेला वेग आला असून, ही प्रक्रिया ऑफलाईन आहे त्यामुळे, हे कार्ड मिळण्यास नवे वर्ष येणार आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !