शोध न्यूज : महाराष्ट्राचा बिहार झाल्याची टीका राज्याभर होऊ लागली असतानाच, आणखी एक थरारक आणि काळजाचा ठोका चुकविणारी घटना समोर आली आहे . रेल्वे प्रवासात लागलेली झोप एका महिलेला भलतीच महागात पडली असून, तिच्यावर सामुहिक बलात्कार तर करण्यात आलाच पण नराधम तेवढ्यावर थांबले नाहीत.
गेल्या अनेक वर्षांपासून, मोठी घटना घडली की, महाराष्ट्राचा बिहार झाला काय ? असा सवाल विचारला जात होता परंतु आता महाराष्ट्राचा बिहार झाला असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्याचा गृह विभाग आणि गृहमंत्री देवेंद्र फडवीस यांच्यावर सातत्याने टीका होत असून, गृहखाते सांभाळण्यापेक्षा त्यांना राज्राकारण महत्वाचे वाटू लागले आहे, इतरांचे पक्ष फोडून सत्ता कशी मिळेल आणि ती अबाधित कशी राहील यासाठीच त्यांचा सगळा वेळ जात असल्याच्या प्रतिक्रिया आधीच आल्या होत्या. गेल्या काही दिवसात तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे पण गृहमंत्री शांत शांत दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदाराने भर पोलीस ठाण्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहर प्रमुखावर गोळ्या झाल्या, वकील पतीपत्नीचे न्यायालयातून अपहरण करून त्यांना ठार करण्यात आले, पुण्यात कोयता टोळी सक्रीय असतानाच शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार करण्यात आले आणि आता, शिवसेनच्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर फेसबुक लाईव्ह करीत असताना गोळ्या झाडल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. आणखीही अशा काही घटना घडल्या आहेत त्यामुळे, राज्याचे गृह खाते आहे तरी कुठे ? आणि कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? असे सवाल विचारले जाऊ लागले आहेत.
एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे गृह खाते टीकेचे धनी होत असतांनाच महाराष्ट्रात एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. महिलावरील अत्याचार वाढत आहेत, अल्पवयीन मुलीला देखील शिकार केले जात आहे. अशा घटना रोजच समोर येत असताना, ही एक मोठी घटना समोर आली आहे. आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून पुणे येथून कऱ्हाडला निघालेल्या विवाहित तरुण महिलेला रेल्वेत झोप लागली आणि ही झोप तिला भलतीच महागात पडली. रेल्वेने कऱ्हाडला जात असताना या तरुण महिलेला झोप लागली आणि ती कऱ्हाड रेल्वे स्थानकावर उतरलीच नाही. झोपेत ती तशीच पुढे गेली आणि ती मिरज येथे पोहोचली. लवकर गाडी नसल्यामुळे तिला मिरज रेल्वे स्थानकावर थांबून राहावे लागले. ती स्थानकावर थांबलेली असताना, काही तरुण तिथे आले आणि तिला बळजबरी करीत जवळच्या झुडुपात ओढून नेले, या झुडूपातच तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. बलात्कार केल्यानंतर या नराधमांनी तिला रेल्वे पुलाच्या जवळच असलेल्या एका पत्राशेडमध्ये कोंडून ठेवले.
या शेडमध्ये कोंडल्यानंतर त्यातील एका तरुणाने पुन्हा तिच्या शरीराचे लचके तोडले. ही घटना घडली पण नराधम थांबले नाहीत तर त्यांनी या तरुण महिलेला विकण्याचे कारस्थान रचले. तिला घेवून ते जमखंडी येथे गेले आणि तेथेही तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या तरुणीस चार लाख रुपयास विकून टाकले आणि तिचे लग्न बळजबरी करून लाऊन दिले. दरम्यानआपली मुलगी अजून कशी आली नाही ? या विवंचनेत तिचे आई वडील होते. तिची वाट पाहून ते कासावीस झाले होते. अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि आपली मुलगी बेपत्ता असल्याचे पोलिसांना सांगतिले. पोलिसांनी तक्रार दाखल करुन सदर तरुण विवाहितेचा शोध सुरु केला. दरम्यान ज्याने या तरुणीला विकत घेतले होते, त्याला सगळी माहिती मिळाली. तरुणीवर सामुहिक बलात्कार करून त्यांनी या तरुणीला विकले असल्याचे त्याला समजले तेंव्हा त्यालाही धक्का बसला आणि त्याने या तरुणीला पुन्हा मिरजेत आणले, तेथे [ख्वाजा वस्तीजवळ आणून सोडले.
घडत असलेल्या एकूण प्रकाराने तरुण हादरून गेली होती, एकामागून एक घटना तिच्याबाबत घडत होत्या. भेदरलेल्या अवस्थेत या तरुणीने मिरज पोलीस स्टेशन गाठले आणि न्यायाची मागणी करू लागली. घटना ऐकून पोलीस देखील हादरून गेले आणि त्यांनी लगेच या घटनेचा तपास सुरु केला. (Gang rape of a married woman) पोलिसांच्या हाताला धागेदोरे लागले आणि त्यांनी सात जणांना या प्रकरणी अटक केली आहे. सरफू फकीर, वय २०, संतोष बाबू ,वय२६, जुबेद, वय २४, खालीद कोरबू, वय २०, महंमदहुसैन, वय३१, अबूजर जमादार वय १८, महंमद मुल्ला वय २० अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. या घटनेने मानवी मन हादरून गेले असून, गुन्हेगारांना कायद्याचे आणि पोलिसांचे भय उरले नाही याचेच हे आणखी एक बोलके उदाहरण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !