BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ एप्रि, २०२४

पंढरपूर - मिरज रस्त्यावर भयंकर अपघात , चौघांचा मृत्यू तर कित्येक जखमी !



शोध न्यूज : पंढरपूर - मिरज मार्गावर झालेल्या भीषण आणि भयंकर अपघातात चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दहा ते पंधरा जण जखमी झाले आहेत, मृतात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मजुरांचा समावेश आहे.

उस तोड कामगारांना घेवून जात असलेल्या ट्रॅक्टरला एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री नंतर झालेल्या या अपघातात, चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. उस तोडणी कामगारांना घेवून जात असलेल्या ट्रॅक्टरला ट्रकने पाठ्मागून  धडक दिली त्यामुळे या अपघातातून बचावणे कठीण होते.  या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चौघात, दोन महिला, एक मुलगा आणि एका लहान  मुलीचा  समावेश आहे. मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी येथील उस तोड मजूर परत जात असताना हा अपघात झाला आहे... हे मजूर ऊस तोडणीच्या कामासाठी सांगली जिल्ह्यात गेले होते. काही काळ त्यांनी उस तोडण्याचे कष्ट घेतले आणि येथील काम संपवून ते, परत आपल्या घराकडे निघाले होते, दुर्दैवाने त्यांना आपल्या घरापर्यंत  पोहोचू दिले नाही.. हे मजूर मंगळवेढ्याच्या दिशेने निघाले असताना, रस्त्याच्या बाजूला थांबले होते. ट्रॅक्टर थांबलेला असतानाच, मागील  बाजूने भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली आणि एका क्षणात बरेच काही भयंकर घडून गेले. नागज फाट्याजवळ अपघाताची ही घटना घडली. 

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो. उस तोडणीच्या कामासाठी येथील मजुरांना  सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते. येथील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते. हंगाम संपल्यामुळे ते पुन्हा आपल्या घरी परतू लागले होते पण वाटेतच त्यांना काळाने गाठले. 

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एक जण शिरनांद्गी येथील तर अन्य तीन हे चिखलगी येथील आहेत. मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर (वय 30 रा. शिरनांदगी) , जगमा तम्मा हेगडे (वय 35) दादा आप्पा ऐवळे (वय 17) निलाबाई परशुराम ऐवळे रा.चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ आणि मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले. जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ आणि मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले. . रस्ते रुंद झाले, सिमेंटचे रस्ते तयार झाले पण हे रस्ते म्हणजे मृत्यूचे महामार्ग बनत चालले आहेत. वाहनाच्या वेगावर कसलीच मर्यादा राहिली नसून, प्रत्येकाला घाई झाली  आहे, इतरांच्या जीवाची पर्वा कुणालाच उरली नसल्याचे दिसत आहे, आणि यातूनच अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !