BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ मार्च, २०२४

कॉंग्रेस आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न !


शोध न्यूज :  लोकसभेची निवडणूक सुरु झाली आणि राजकारणाचे एकेक रंग दिसायला लागले. महायुती असो, किंवा महा विकास आघाडी .... उमेदवारी न मिळालेले अनेक इच्छुक, या  पक्षातून त्या पक्षात उड्या मारताना दिसणार आहेतच .... तशी सुरुवात देखील झाली आहे.. ज्यांची  उमेदवारी जाहीर झाली, त्यांनी तर प्रचार सुरु केलाच आहे... सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेसने प्रणिती शिंदे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे... प्रणिती शिंदे या मतदार संघात आधीपासूनच दौरा करीत आहेत.  काही ठिकाणी त्यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावेही लागले आहे, पण मराठा बांधवांनी अत्यंत संयमाने विरोध केला आहे. अशा परिस्थितीत प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा मोठा प्रयत्न, पंढरपूर तालुक्यात झाला आहे... पण हा हल्ला केला  कुणी ? मराठा समाज की भारतीय जनता पक्षाने ? 


गुरुवारी प्रणिती शिंदे या पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत होत्या. त्यानुसार त्या सरकोली गावाजवळ, प्रणिती शिंदे यांच्या वाहनाला अडवून, जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीच, पण  त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्नही झाला. अर्थातच या मुळे प्रणिती शिंदे प्रचंड चिडलेल्या होत्या.... जमाव चालून आलेला असतानाही त्या घाबरल्या नाहीत, उलट गाडीतून खाली उतरून त्यांनी, 'गाडीला हात लावायचा  नाही'  अशा आक्रमक भाषेत जमावाला सुनावले...यावेळी बरीच शाब्दिक चकमक देखील  झाली....प्रणिती शिंदे यांची गाडी सरकोली गावाजवळ आली तेव्हा आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. तुम्ही आमच्या गावात कशासाठी आलात, तुम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याची क्लीप दाखवा. आम्हाला गाडी फोडायला लावू नका, अशी आक्रमक भाषा वापरली जात होती. या जमावाकडून प्रणिती शिंदे यांना जाब विचारला जात होता. जमाव आक्रमक असला तरी प्रणिती शिंदे या थेट त्यांना भिडल्या .... याची देखील  मोठी चर्चा होत आहे... पण हा हल्ला करणारे नक्की  कोण होते ?  'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत असलेला जमाव, आक्रमक झालेला दिसत होता पण हा जमाव, खरोखरच मराठा बांधव होते का ? हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे, स्वत: प्रणिती शिंदे यांनीच केलेला खुलासा .....   प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. मराठा आंदोलकांमध्ये घुसून भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. यासंदर्भात पोलिस तक्रार करायची की नाही, याबाबत मी निर्णय घेईन. छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांनी ही शिकवण दिलेली नाही. त्यामुळे मराठा आंदोलक असे करणार नाहीत, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले.


आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर झालेला हा प्रकार समर्थनीय नाही पण हल्ल्याचा प्रयत्न नक्की कुणी केला हे समोर येण्याची गरज आहे, अन्यथा अशाच प्रकारे काळ सोकावण्याची मोठी भीती आहे . अजून तर निवडणूक प्रचारात रंग यायचा आहे, पण त्या आधीच अशा घटना घडू लागल्या तर ते गंभीर आहे.... मराठा आरक्षण मिळाले नसल्यामुळे, मराठा समाज शिंदे फडणवीस सरकारवर संतापलेला आहे. लोकसभा निवडणुकीत तो या सरकारला इंगा दाखविण्याच्या तयारीत आहेच.... प्रणिती शिंदे यांना मराठा समाजाने गावोगावी रोखण्याचा प्रयत्नही केला आहे... मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यात त्यांना याचा अनुभव आला आहे.. पण मराठा बांधवांनी कुठेही काही अनुचित केलेले नाही, मग सरकोली जवळच नेमके असे काय घडले ?  प्रणिती शिंदे यांनी तर थेट भाजपवर आरोप केला आहे.... 


भाजपचे लोकांनीच आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे... मराठा आंदोलकांच्या आड दडून भाजपा असे प्रकार करीत आहे  काय ? याची चौकशी होणे आवश्यक आहे, प्रणिती शिंदे यांनी  पोलिसात तक्रार नाही दिली तरी देखील चौकशी होणे आवश्यक ठरणार आहे, कारण असे प्रकार घडले तर, विनाकारण मराठा समाज बदनाम होईल ..... मराठा आंदोलनाच्या आड दडून, दगडफेक, जाळपोळ केल्याच्या घटना आधी समोर आलेल्याच आहेत, मराठा आंदोलक असा लेचापेचा नाही आणि तो कुणाला घाबरतही नाही.... मराठा आंदोलक अंधारातून वार करीत नाही,  काही केले तर पळूनही जात नाही. मग, आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे कोण होते ? याचे उत्तर तर मिळायलाच हवे ..... प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आरोपानुसार, जर ते भाजपचे लोक असतील तर, मराठा बांधवाने आता अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता आहे... एकीकडे मराठा बांधव सरकारला जेरीला आणू पहात आहे आणि त्यातच मराठा समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र कुणी रचतेय काय ? हे पाहणे आवश्यक आहे....   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !