BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ मे, २०२३

खिशातच झाला स्फोट आणि कपड्यांना लागली आग !


शोध न्यूज :  बसल्या बसल्या एका व्यक्तीच्या खिशातच मोबाईलचा स्फोट झाला आणि पाहता पाहता त्याच्या कपड्यांनाही आग लागल्याची एक धक्कादायक घटना सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आली आहे, त्यामुळे मोबाईल जेवढा गरजेचा तेवढाच तो धोकादायक आहे हे देखील पुन्हा एकदा आढळून आले आहे.


हल्ली प्रत्येकाच्या खिशात मोबाईल असतो, काही व्यक्तींकडे एकापेक्षा अधिक मोबाईल देखील असतात. मोबाईल हा आता केवळ संपर्काचे साधन उरले नसून तो आता ज्याच्या त्याच्या जीवनाचा भाग बनला आहे. लहान मुले गोंधळ करीत असतील, रडत असतील तरी त्यांच्या हातात मोबाईल देवून त्यांना शांत केले जाते. थोडीशी मोठी मुले असतील तर ते घरात केवळ आणि केवळ मोबाईल घेवून बसलेले असतात. मैदानी खेळ आता केवळ पुस्तकातील कथा उरलेल्या आहेत. अशाच वेळी हा मोबाईल घातक आणि जीवघेणा ठरत असल्याचे स्पष्ट करणाऱ्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत. मोबाईलचे स्फोट होऊन कुणी जखमी झाले आहे तर कुणी मृत्युमुखीही पडले आहे. त्यामुळे जेवढे फायदे, तेवढे तोटे देखील या मोबाईलचे आहेत. अनेकदा मानवी चुकीमुळे तर कधी माणसांची काही चूक नसताना, मोबाईलचे स्फोट होऊ लागले आहेत. हा धोका प्रत्येकाच्या खिशातच असतो.


आता अशी एक घटन समोर आली आहे की, मोबाईल खिशात ठेवायचा की नाही ? असा प्रश्न स्वत:लाच विचारण्याची वेळ आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चहाच्या दुकानात काही वेळ शांतपणे बसलेल्या एका व्यक्तीच्या खिशात असलेल्या मोबाईलचा एकदम स्फोट होतो, वास्तविक या मोबाईलवर बोलणे सुरु नव्हते की तो चार्जिंगला देखील लावलेला नव्हता. व्यक्त चहाच्या हॉटेलमध्ये निवांत बसलेला असताना त्याच्या खिशात एकदम आग लागते. स्फोटाचा आवाज येतो तेंव्हा नेमके काय झालेय हे त्याच्या लक्षातही येत नाही, नंतर मात्र हा धक्कादायक प्रकार त्याला जाणवतो. खिशात मोबाईलचा स्फोट होऊन आग लागू लागते, यावेळी त्याला तो मोबाईल बाहेर काढणेही अशक्य होते. स्फोटामुळे खिशात लागलेली आग भडकू लागते, तेंव्हा मात्र त्याची चांगलीच घाबरगुंडी उडते.  यावेळी त्याला दुसऱ्या एका व्यक्तीची मदत होते. 


अन्य व्यक्तीच्या मदतीने त्याच्या खिशातला पेटलेला मोबाईल बाहेर काढला जातो त्यामुळे अधिक अनुचित काही घडत नाही, त्याचे कपडे पेटलेलेही यात स्पष्ट दिसून येत आहे. ही घटना मात्र अत्यंत भयावह आणि भयंकर होती. (A sudden explosion of a mobile phone in a pocket,)  केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातील मारोट्टीचलमध्ये  घडलेली ही घटना सीसीटीव्ही मुळे समोर आली असून, घटना चित्रित झाल्याने नेमके काय घडले आहे हे पाहायला मिळते. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. तुम्हीच पहा ही थरारक आणि जीवघेणी घटना !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !