BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ एप्रि, २०२४

पोलीस ठाण्यासमोरच तरुणाने घेतले स्वत:ला पेटवून आणि ----


शोध न्यूज : एका बारचा मालक असलेल्या तरुणाने चक्क पोलीस ठाण्याच्या समोरच स्वत:ला पेटवून घेतले त्यामुळे पोलीस दलात खळबळ तर उडालीच  पण पोलिसांच्या बद्धल लोकांची काय मानसिकता आहे हे देखील या  घटनेने समोर आले आहे. 


पोलीस हा जनतेचा मित्र असतो असे म्हणतात पण प्रत्यक्षात येत असलेला अनुभव वेगळाच असतो, जनतेत पोलीस दलाबाबत प्रतिकूल मत सगळीकडेच आहे,  अर्थात सगळेच पोलीस काही असे नसले तरी, प्रमाण मात्र जास्त आहे. पोलिसांच्या अत्याचाराला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्या असल्याच्या कित्येक घटना आजवर समोर आलेल्या आहेतच पण आता, एका बार मालक तरुणाने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाउल उचलले आहे.  पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि  पोलिस निरीक्षकांच्या हप्तेखोरीला कंटाळून एका बारमालक असलेल्या तरुणाने पोलिस ठण्यातच स्वत:ला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सत्यम गावडेचा वाघोली येथे बार आहे. बार रात्री दीड नंतर बंद करणे गरजेचे असतांना तो बंद केला नाही,   रात्री उशिरापर्यंत बार सुरू असल्याचे सांगून महिनाभर बार बंद ठेवावा लागेल अशी तंबी पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.  महिनाभर बार बंद ठेवणे म्हणजे मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार होता. पोलिसांनी केवळ ही तंबीच दिली नाही तर पोलीस आयुक्तांचे आदेश आहेत, असे देखील सांगण्यात आले आणि बार बंद ठेवावा लागेल असे म्हणत एका महिला अधिकाऱ्याने दम दिला असल्याचा आरोप सत्यम गावडे या तरुणाने केला आहे. बंद असलेले दुकान उघडण्यास संबंधित महिला अधिकारी यांनीच सांगितले आणि लगेच, रात्री उशिरापर्यंत दुकान सुरु ठेवल्याचा आरोप करण्यात आल्याचा एक मोठा आणि धक्कादायक आरोप या तरुणाने पोलिसांवर केला आहे. 


या सर्व प्रकारामुळे या तरुणाने लोणीकंद पोलिस ठाण्याच्या बाहेरच, पोलिसांच्या साक्षीने  स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. यावेळी येथे कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसाने धाव घेत या तरुणाला रोखले आणि पुढील मोठी दुर्घटना टळली गेली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.  या घटनेचा एक व्हिडीओ देखील सत्यम याच्या मित्राने काढला होता परंतु तो पोलिसांनी सर्व व्हिडीओ मोबाईलमधून डिलीट केले असा आरोपही या तरुणाने केला आहे. अवघ्या काही दिवसापूर्वी वाघोली येथे देखील अशीच घटना घडली होती. पोलीस चौकीच्या बाहेरच एका तरुणाने, स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली होती. या घटनेची चर्चा अजूनही सुरु असतानाच, ही घटना घडली आहे.  बार मालक तरुणाने पोलिसावर गंभीर आरोप देखील केले आहेत. अशा घटनामुळे पोलिसांच्या प्रतिमेला आणखी धक्का लागला आहे. आता पोलिसांवर कारवाई होते की पुन्हा याच  तरुणाला कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागते हे पाहावे लागणार आहे.  पोलिसांची बाजू मात्र अद्याप समोर आलेली नाही, त्यानंतरच या घटनेतील अधिक तपशील हाती येणार आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !