BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ सप्टें, २०२२

हद्दपार वाळू तस्कर तानाजी शिंदेला अटक !

 



शोध न्यूज : हद्दपारीची कारवाई केलेला राष्ट्रवादीचा तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे हा पोलिसांची नजर चुकवून पुन्हा पंढरपूर तालुक्यात आल्याने पोलिसांना त्याला अटक केली आहे.


पंढरपूर तालुक्यातील आंबे, गोपाळपूर, अनवली येथील दोन टोळ्या प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच हद्दपार केल्या आहेत.आंबे येथील वाळू उपसा करणारे तसेच मारामारी, भांडण करणाऱ्या टोळीतील काही जणांवर हद्दपारीची ही कारवाई करण्यात आली आहे. यात पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील राष्ट्रवादीचा तालुका उपाध्यक्ष तानाजी शिवाजी शिंदे, हरी शिवाजी शिंदे, बापू शिवाजी शिंदे, शंकर राजाराम शिंदे, धनाजी उद्धव शिंदे, उप सरपंच निशाल बापू शिंदे, विलास उर्फ विकास बापू शिंदे, सिद्धू सुरेश नागाने, बाबासाहेब उर्फ बाबूराव मनोहर जाधव, आनंद जनार्धन सगर यांचा समावेश आहे. वाळूचा अवैध उपसा करून विक्री करण्याबाबत यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा होत नसल्याने आणि या लोकांमुळे दहशत वाढत असल्याने पोलिसांनी ही कारवाई नुकतीच करण्यात आली होती. 


हद्दपारीची कारवाई प्रत्यक्षात करण्यात आल्यानंतर तडीपार असतानाही राष्ट्रवादीचा तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे हा पुन्हा पंढरपूर तालुक्यात आलेला असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वीच त्याला पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माढा, मोहोळ, माळशिरस या सहा तालुक्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. असे असतानाही पोलिसांची नजर चुकवत हद्दपारीचा आदेश झुगारून तो पुन्हा पंढरपूर तालुक्यात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून अटक केली. (Deported sand smuggler Tanaji Shinde arrested) शिंदे हा अनवली चौकात आला असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती आणि त्याप्रमाणे तो पोलिसांना सापडला. 


मारामारी आणि मालाविषयक गुन्हे करणाऱ्या दुसऱ्या टोळीतील पंढरपूर तालुक्यातील आणवली येथील शरद शिवाजी गांजाळे, बिरुदेव शिवाजी कोकरे, सोमनाथ तानाजी बनसोडे यांना तर गोपाळपूर येथील संजय ज्ञानेश्वर गडदे आणि प्रवीण अशोक मेटकरी यांनाही सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षे कालावधीसाठी हद्दपार केले आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !