BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ एप्रि, २०२४

पंढरीत मिक्सरचा स्फोट, एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू !



शोध न्यूज : घरातील मिक्सरचा स्फोट होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर येथे घडली असून, मिक्सर देखील धोक्याचा ठरू शकतो हे या दुर्घटनेने समोर आले आहे.


घरातील किचनमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊ शकतो याची कल्पना सर्वानाच असते आणि अशा कित्येक घटना घडलेल्या आहेत, अशा घटना घडू नये म्हणून घराघरात काळजी देखील घेतली जाते परंतु मिक्सरचा स्फोट होऊ शकतो आणि त्यातून जीव जाऊ शकतो अशी उदाहरणे नाहीत. पंढरपूर येथे मात्र अशी घटना समोर आली आहे, त्यामुळे मिक्सर वापरताना देखील काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आता समोर आले आहे.  पंढरपूर येथील विस्थापित नगर भागातील एका महिलेचा मिक्सरच्या स्फोटात मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. विस्थापित नगर येथे राहणाऱ्या तीस वर्षे वयाच्या मयुरी अक्षय मेनकुदळे यांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास सदर परिसरात एका मोठा आवाज झाला. हा आवाज परिसरात ऐकू गेला, त्यामुळे या आवाजाबाबत परिसरात चर्चाही सुरु झाली. एवढा मोठा आवाज कशाचा असावा ? असा अनेकांना प्रश्न पडला. या परिसरात शोभेची दारू बनवली जात असल्याची चर्चा असल्यामुळे, शोभेची दारू तयार करताना हा स्फोट झाला असावा अशी शंका काही नागरिकांना आली, प्रत्यक्षात मात्र हा स्फोटाचा आवाज असून, एका मिक्सरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली. 


मिक्सरचा अचानक स्फोट होऊन, मयुरी मेनकुदळे यांच्या कुटुंबियांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. मिक्सरचा स्फोट झाला आणि यात गंभीर जखमी होऊन मयुरी मेनकुदळे यांचा मृत्यू झाला, मिक्सरच्या ब्लेडमुळे मयुरी यांचे पोट कापले गेले शिवाय त्यांचा एक हात देखील तुटला आहे. स्फोट झाल्याच्या ठिकाणी विजेच्या वायर देखील आढळून आलेल्या आहेत. गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली  पोलिसांनी उप जिल्हा रुग्णालयात जाऊन देखील माहिती घेतली असून, (Mixer explosion kills woman in Pandharpur) सदर महिलेचा मृत्यू हा मिक्सरच्या स्फोटामुळे झाला असल्याचे, पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. तथापि याबाबत फॉरेन्सिक तंत्रज्ञानची मदत घेतली जाणार असल्याचे  सांगण्यात आले आहे. या घटनेने परिसरात मात्र मोठी खळबळ उडाली असून, मिक्सर देखील जीव घेऊ शकतो हे समोर आले आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !