BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ नोव्हें, २०२३

---- तर औलाद सांगणार नाही ! आमदार शहाजीबापू पाटील यांना दिले थेट आव्हानच !




शोध न्यूज : चिकमहूद ग्रामपंचायतीवर विजय मिळवताच, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेवर टीका करणे पुन्हा सुरु केले आणि युवा शिवसैनिकाने त्यांना थेट खुले आव्हानच दिले. आता शहाजीबापू पाटील यावर काय बोलतात हे पाहावे लागणर आहे.


शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारात, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे आघाडीवर होतेच, शिवाय त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे जे काही  मोजके आमदार आहेत, त्यात देखील शहाजीबापू पाटील आघाडीवर आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावरही आजवर अत्यंत टोकाची टीका झाली आहे.  शिवसेना फोडून हे आमदार गुवाहाटी येथील एका हॉटेलात मुक्कामास होते तेंव्हा, फोनवरील त्यांचा 'काय झाडी, काय डोंगार, काही हाटील ... समदं ओक्के'  हा संवाद प्रचंड व्हायरल झाला होता. अर्थात हा व्हायरल झाला होता की, जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला होता याबाबत मतमतांतरे आहेत. हा संवाद मात्र अनेपेक्षित गाजला आणि संगोल्यापुरते मर्यादित असलेले शहजीबपुम राज्याच्या कोनाकोपऱ्यात पोहोचले, या संवादावर काही गाणी देखील तयार झाली तर काही हॉटेलची नावे देखील यावरून ठेवण्यात आली. 


या संवादाने आमदार शहाजीबापू पाटील यांना प्रसिद्धी मिळवून दिली परंतु त्यानंतर आमदार पाटील यांनी, शिवसेनेवर सातत्याने टीका करायला सुरुवात केली. बंडखोर आमदारांपैकी बहुतेक आमदार गप्प असताना देखील बापू मात्र सतत उद्धव ठाकरे, शिवसेना, शरद पवार, अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेत राहिले. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून त्यांनी पवारांचे नाव टाळले आले तरी देखील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना काही थांबत नाहीत. सांगोला तालुक्यातील चार ग्राम पंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आणि त्यातील तीन ग्रामपंचायतीवर शेकाप ने सत्ता मिळवली, आ. पाटील यांच्या गावातील, म्हणजे  चिकमहूद येथील ग्रामपंचायत निवडणूक देखील झाली, चार पैकी एक ग्रामपंचायत पाटील यांना मिळवता आली त्यामुळे टीका होत असतानाच, शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना थेट खुले आव्हानच दिले आहे. 


शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या शहाजीबापू पाटील यांनी, शिवसेनेला मोठ्या प्रमाणात दुखावले आहेच, शिवाय शिवसैनिकांच्या जीवावर आपण निवडून आलेलो नाही असेही विधान त्यांनी केले होते. हे विधान शिवसैनिकांना फार झोम्बलेले आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांचा पराभव करायचाच असा चंग स्थानिक शिवसेनेने बांधला आहे. (Challenge of Yuva Sena to Shahajibapu Patil) वास्तविक पाटील यांच्यासाठी आगामी विधानसभा कठीण असल्याचे सांगितले जात आहेच पण, त्यांची शिवसेनेवरील जहरी टीका काही केल्या थांबत  नाही. सांगोला तालुक्यातील चार पैकी केवळ आपल्या गावाची एक ग्रामपंचायत निवडणूक जिंकली असली तरी त्यांनी पुन्हा, उद्धव ठाकरे शिवसेनेवर टीका केली आहे, यामुळे पुन्हा ते चर्चेत आले आणि युवा सेनेने त्यांना आव्हानच देवून टाकले आहे. या आव्हानात शिवसैनिकांचा राग किती अनावर आहे हे देखील दिसून येत आहे. 


शिवसेनेचे ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी शहाजीबापू पाटील यांना आव्हान दिले आहे. काय म्हणाले गणेश इंगळे ते पहा. "शहाजीबापू, आज तुम्हाला नक्कीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांची आठवण आली असेल, तुम्ही सांगोल्यातील शिवसेनेबद्धल वक्तव्य केले होते, की सांगोल्यातील शिवसेनेत फक्त अकराशे मते आहेत. आणि मी माझ्या हिमतीवर निवडून आलो आहे. शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेलो नाही, तुम्ही आणखी एक दुसरे वक्तव्य केले होते, युवा सेनेची पोरं म्हणजे टुकार पोरं आहेत, पण बापू, याच टुकार पोरांनी, युवा सेनेच्या याच तालुका प्रमुखांनी, सुभाष भोसले यांनी तुम्हाला घाम फोडला. तुमच्याच गावात, याच सुभाष भोसले यांनी तुमच्या छाताडावर बसून २ हजार ९८ मते घेतली, आणि तुम्हाला घाम फोडला, अहो बापू, तुम्ही दसरा मेळाव्याला .... तुमच्या गद्दार दसरा मेळाव्याला जाऊ शकला नाही,  गावातील ग्रामपंचायत निवडणूक लागल्यामुळे तुम्ही मेळाव्याला जाऊ शकला नाहींत. सुभाष भोसले यांनी तुम्हाला तळ ठोकून बसण्याची वेळ तुमच्यावर आणली. याच्यापेक्षा तुमच्यावर दुर्दैवाची वेळ येऊ शकत नाही. बापू, तुम्हाला युवा सेना आणि शिवसेनेकडून दुसरे एक चॅलेंज देतो, तुम्ही आमदारकीची निवडणूक लढवावी, जर तुम्हाला शिवसेना आणि युवा सेनेने आस्मान नाही दाखवलं तर, शिवसेनेची औलाद सांगणार नाही. हे तुम्हाला ओपन चॅलेंज देतो "       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !