BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ जाने, २०२२

धावत्या प्रवासी रल्वे एक्सप्रेसला लागली आग ! 'दी बर्निंग ट्रेन' चा थरार !

 



नंदुरबार : धावत्या गांधीधाम - पुरी एक्सप्रेसला आग लागल्याने 'दि बर्निंग ट्रेन' चा थरार अनुभवायला मिळाला. जीव वाचविण्यासाठी प्रवाशांचा आक्रोश आणि आरडाओरडा सुरु झाला आणि एकच गोंधळ उडाला. 


धावत असलेल्या प्रवासी रेल्वे एक्सप्रेसला आग लागल्यानंतर निर्माण होणारा थरार आपण केवळ चित्रपटातच पहिला आहे पण आज साक्षात अशी घटना घडली आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. जीव वाचविण्यासाठी प्रचंड आकांत करण्यात आला. एकीकडे धुमसती आग आणि दुसरीकडे प्रवाशांचा गोधळ उडालेला होता. गांधीधाम - पुरी एक्सप्रेस च्या दोन डब्यांना ही आग लागली तेंव्हा ही रेल्वे नंदुरबार रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर होती. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही पण आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम वेळेत सुरु करण्यात आले. 


धावत्या रेल्वे एक्सप्रेसला लागलेली ही आग भीषण होती त्यामुळे प्रवाशांत प्रचंड घाबरत निर्माण झाली आणि त्यांनी जीव वाचविण्यासाठी आकांत सुरु केला. प्रचंड आरडाओरडा सुरु झाला होता. गांधीधाम एक्सप्रेस पुरीच्या दिशेने निघाली असताना नंदुरबार स्थानकाच्या काही अंतरावर ही गाडी असताना एक्सप्रेस मधील पॅन्ट्री डब्यात ही  आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच रेल्वे थांबविण्यात आली आणि लगेच रेल्वेतील प्रवाशी खाली उतरले. सगळेच प्रवाशी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते.  भडकणारी आग आणि धुरांचे लोट यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. 


स्थानक जवळ आल्याने रेल्वे एक्सप्रेसचा वेग कमी होता आणि मोटरमनला त्यामुळे वेळीच रेल्वे थांबविता आली. तातडीने आग विझविण्यास सुरुवात करण्यात आली पण आग अधिकच भडकत राहिली. ही आग कशामुळे लागली हे लगेच समजू शकले नाही. नंदुरबार येथून अग्निशामक दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि आग विझविण्याचे काम नेटाने सुरु आहे. आग लागलेले डबे वेगळे करण्यात आले आहेत तसेच दोन डब्यात कुलिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. पेटलेल्या रेल्वेच्या आगीचा थरार आज प्रवाशांनी प्रत्यक्षात अनुभवला आहे.       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !