BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ जून, २०२२

अहिल्या पुलावर अपघात, दोन जागीच ठार !



पंढरपूर : भीमा नदीवरील अहिल्या पुलावर झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असून या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


पंढरीतील सरगम चौक ते अहिल्या पूल हा परिसर कायम धोक्याचा बनला असून या रस्त्यावर आजवर अनेक अपघात झाले आहेत. अहिल्या पूल तर अपघाताचे केंद्र बनू लागले आहे. या पुलावरून अनेक वाहने देखील नदीत कोसळली आहेत. या परिसरात जड वाहनांची वाहतूक असल्यामुळे आणि हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळे सतत अपघाताची टांगती तलवार असते. काल पुन्हा एकदा अहिल्या पुलावर अपघात झाला असून या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Accident on Pandharpur Ahilya bridge) पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथील १८ वर्षे वयाचा तरुण कार्तिक लाला गायकवाड आणि ४० वर्षीय  कांतीलाल कांबळे हे दुचाकीवरून निघालेले असताना हा दुर्दैवी अपघात झाला. 



दुचाकीवरून दोघे निघालेले असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की दुचाकीवरील दोघेही जागीच मृत्युमुखी पडले. या अपघातात ठार झालेले दोघेही एकाच गावाचे असून यात अठरा वर्षे वयाच्या एका तरुणाचा देखील समावेश आहे. या घटनेने भटुंबरे गावावर शोककळा पसरली आहे. काल शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली आहे.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !