BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ मे, २०२२

पोहायला गेलेल्या तरुण डॉक्टरांचा बुडून मृत्यू !

 



माढा : सीना नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या तरुण डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला (Young doctor drowns in river) असून या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.

 

उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा वाढलेला आहे आणि वाढत्या तपमानात दिलासा मिळविण्यासाठी अनेकजण विहीर, नदी कालवे अशा ठिकाणी पोहायला जात आहेत. अशा वेळी दुर्घटना घडण्याची भीती सतत असते आणि काही घटना देखील घडून गेल्या आहेत. अशाच प्रकारे एक तरुण डॉक्टर आपल्या काही सहकाऱ्यांसह सीना नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेले असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. माढा तालुक्यातील रिधोरे बंधाऱ्याजवळ सीना नदीच्या पात्रात ही दुर्घटना घडली आहे. २६ वर्षे वयाचे डॉक्टर रेहान आरिफ सय्यद हे इंदापूर येथील असून ते सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात सेवेत होते. 


डॉ. रेहान सय्यद हे माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील त्यांच्या वडिलांचे मित्र संजय सरोदे यांच्या शेतात सुट्टीनिमित्त आले होते. उन्हाचा कडाका आणि उकाडा असल्यामुळे त्यांनी सीना नदीत पोहायला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे भाऊ अमन सय्यद आणि जिब्रान सय्यद यांच्या समवेत सीना नदीत ते पोहोण्यासाठी गेले. कडाक्याचे ऊन असल्याने त्यांना नदीत पोहोण्यात आनंद मिळत होता. पोहोता पोहोता ते बंधाऱ्याच्या दाराजवळ गेले परंतु आधी त्यांच्या हे लक्षात देखील आले नाही. बंधाऱ्याच्या दाराच्या दिशेने पाण्याचा प्रवाह अधिक होता त्यामुळे त्यांना पाण्याच्या प्रवाहाचा त्रास होऊ लागला. त्यांनी तेथून बाजूला येण्याचा बराच प्रयत्न केला पण त्यांना ते जमले नाही. यावेळी पोहोताना त्यांना बराच थकवा आलेला होता त्यामुळे त्यांना काठावर येणे अवघड झाले होते. थकव्यामुळे त्यांना नदीच्या बाहेर येता आलेच नाही आणि ते पाण्यात बुडाले. त्यांचे भाऊ अमन आणि जिब्रान यांनी त्यांना पाण्याबाहेर काढले पण ते बेशुद्ध झालेले होते. 


बेशुद्धावस्थेत डॉक्टर रेहान सय्यद याना तातडीने कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले परंतु त्यापूर्वीच त्यांच्या मृत्यू झाला होता. इंदापूर येथील अवेज जलील मौलानी यांनी याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यानुसार कुर्डुवाडी पोलिसांनी आकस्मिक मयत म्हणून नोंद केली आहे. या घटनेने माढा आणि इंदापूर तालुक्यात देखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत डॉक्टर रेहान सय्यद यांचे वैद्यकीय शिक्षा पुण्यात झाले असून सद्या ते सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत होते. 


हे देखील वाचा >>>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !