औरंगाबाद : तुकडेबंदीचा नियम न्यायालयाने रद्द केला असून आता तुकड्यात देखील जमिनीची खरेदी विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे जमिनीचे तुकडे करून विकण्याची अथवा खरेदी करण्याची सोय झाली आहे.
जमिनीचे तुकडे करून त्याची विक्री अथवा खरेदी करणे कायद्याने अडचणीचे केले होते त्यामुळे इच्छा असली तरी अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी तुकड्यात विकता येत नव्हत्या आणि खरेदी करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यास तुकड्यात जमिनी खरेदी करता येत नव्हत्या पण आता ही अडचण दूर झालेली आहे. राज्यातील तुकडेबंदीचा नियम आणि त्यासंबंधीचे परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरवले आहे त्यामुळे अशा प्रकारे जमिनी खरेदी आणि विक्री करण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. तीन गुंठे नसले तरी तुकड्यात जमिनीची खरेदी करणे त्यामुळे आता शक्य होणार आहे. अशा जमिनीच्या खरेदी आणि विक्रीच्या नोंदणीचे व्यवहार होण्याचा मार्ग खुला झाला आहे.
असा होता नियम
एक एकर जमिनीचा पट्टा असेल तर त्याचे तुकडे करून त्यापैकी एक अथवा दोन गुंठे जमीन विकायची असल्यास ती विकता येत नव्हती आणि त्याची नोंदणी देखील होत नव्हती. जमिनीचे ले औट केले तरच नोंदणीची मुभा देण्यात आलेली होती किंवा जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनेच नोंदणी होत होती.
चांगल्या हेतूने कायदा
जमिनीच्या तुकड्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात येवून शेती विकासाला खिल बसत आहे, शेती विकासाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने तसेच शेतीचे उत्पन्नात सुधारणा करून उत्पादकता वाढविणे या उद्देशाने तुकडेबंदी कायदा अमलात आणला होता आणि त्यावेळी त्याचे स्वागत झाले होते.
परिस्थिती बदलली
तुकडेबंदीचा नियम केला तेंव्हाची परिस्थिती आता राहिली नाही, मुलांना शिक्षण देण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळण्यात अडचण येते, तारण द्यायचे ते पुरेसे नसते शिवाय ज्यांच्याकडे दोन तीन गुंठे जमीन आहे तिची विक्री करण्यात देखील कायद्याची अडचण येत होती पण आता हा नियम बदल झाल्याने देखील स्वागत करण्यात येत आहे
हे देखील वाचा >>>
- यंदा नियमित वेळेच्या आधीच येणार पावसाळा !
- माढ्याच्या खासदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल !
- 'विठ्ठल' च्या निवडणुकीत भालके विरुद्ध काळे ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !