BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ नोव्हें, २०२१

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा हल्ला !



 

'ड्रग पेडलर' शी संबंध 

असल्याचा मोठा दावा 

मुंबई  : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या आरोपाचा हल्ला केला असून फडणवीस यांचे ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा आरोप करीत त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे. 

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ पार्टीसंबंधात 'एनसीबी' चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अटक केल्यापासून राज्यात वेगळाच वाद सुरु झाला असून हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. वानखेडे यांनी केलेल्या या कारवाईपासून त्या घटनेला अनेक कंगोरे प्राप्त होत असून मलिक आणि वानखेडे कुटुंब यांच्यात जोराचा संघर्ष सुरु आहे आणि आता राजकारणानेही कब्जा घेतलेला दिसत आहे. 

आर्यन खान यांच्यावर अटकेची कारवाई करणारे समीर वानखेडे यांच्यावर रोज नवे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत. नवाब मलिक सातत्याने नवनवे पुरावे सादर करीत आहेत त्यामुळे समीर वानखेडे बरेचशे अडचणीत आले आहेत आणि आता राजकीय मंडळी या घटनेचा फायदा उठवू लागल्याने वानखेडे यांचे पाय आणखी खोलात जाताना दिसत आहेत. समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे दलित असल्याचे भासवून नोकरी मिळवली आहे असा आरोप ना. मलिक यांनी केला आहे तर वानखेडे यांच्याकडून हे नाकारण्यात आले आहे. मलिक हे मात्र प्रत्येक घटनेचे पुरावे सादर करीत आहेत त्यामुळे हे प्रकरण गंभीर होत चालले आहे. विषय खोट्या कागदपत्रांचा असला तरी राजकारण या विषयाला जात धर्माचे वळण देऊ लागले आहे. 

वानखेडे यांच्या विषयावर नबाब मलिक आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मर्यादित स्वरूपाची टीका टिपण्णी झाली होती पण आज मलिक यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानाच ड्रग प्रकरणात ओढले आहे . केवळ ओढले नाही तर फडणवीस यांचे ड्रग पेडलर जयदीप राणा याच्याशी कसे संबंध आहेत हे सांगून पुरावाच दिला आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागू लागले असून राज्याच्या राजकारणात एक नवी खळबळ उडाली आहे. 


जयदीप राणा हा सद्या तुरुंगात असून फडणवीस यांच्यासोबत त्यांचे नाते आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या एका गाण्यात फडणवीस आणि मुनगुंटीवार यांनी अभिनय केला होता. त्याचे फायनान्स हेड हा ड्रग पेडलर जयदीप राणा होता असे सांगून मलिक यांनी फडवणीस आणि राणा यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून भाजपातील अनेक नेते मात्र संतापले आहेत. 

फडणवीस यांच्याच आशीर्वादाने महाराष्ट्र ड्रगचे धंदे चालतात आणि फडणवीस हे संरक्षण देतात असेही मलिक यांनी म्हटले आहे. मलिक यांनी आज थेट फडणवीस यांच्यावर हल्ला केल्यानंतर भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ आन अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. 

फोटो जुना आहे !

नवाब मलिक यांनी समोर आणलेला फोटो हा चार वर्षे जुना आहे असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून दिवाळीनंतर पुराव्यासह आपण हे समोर आणणार आहोत, मालिक यांनी सुरु केलेल्या खेळाचा शेवट आता मी करणार असे फडणवीस यांनी सांगितले आहे तर एवढ्या खालच्या पातळीचे आरोप पवार- ठाकरेच करू शकतात असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही याबाबत एक ट्विट केले असून "चोरांच्या उलट्या बोंबा का असतात बुवा ? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते !" असे त्यांनी म्हटले आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !