BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ मे, २०२२

मुलाचा खून करून महिलेची आत्महत्या !

 


पंढरपूर : चंद्रभागेच्या तीरावर लहान मुलाचा खून करून महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 


चंद्रभागा नदीच्या काठावर शेगाव दुमाला हद्दीत काल सकाळी एका महिलेचा आणि दहा वर्षीय लहान मुलाचा मृतदेह आढळून आला होता. ३५ वर्षे वयाची महिला आणि १० वर्षीय मुलाचा हा मृत्यू संशयास्पद अवस्थेत होता. मुलगा अंथुरणावर झोपलेल्या अवस्थेत तर महिलेने गळफास घेतलेल्या स्थितीत असलेला हा मृतदेह इस्कॉन मंदिर ते गुजर घाट या दरम्यान आढळल्याने पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी एकूण परिस्थितीची पाहणी केली. मयत महिला ही बाभळीच्या झाडाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसत होती तर बाजूला असलेल्या लहान मुलाच्या शरीरावर जखमेच्या खुणा आणि छाती लालसर दिसून येत होती त्यामुळे मृतदेहाबाबत संशय  निर्माण झाला होता. 


भीमा नदीच्या काठावर हे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती परंतु मृतांची ओळख पातळी नव्हती. ही आत्महत्या आहे की काही घातपात आहे याबाबत प्रश्न उपस्थित होत होते परंतु पोलिसांनी रात्री उशिरा हा प्रकार खून आणि आत्महत्या असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Woman commits suicide by killing child)  दहा वर्षाच्या मुलाचा  खून करून या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी सदर महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


ओळख पटली नाही 

सदर मृत महिला आणि अल्पवयीन मुलगा यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. सदर महिला आणि मुलगा हरविल्याबाबत कुठल्या पोलीस ठाण्यात नोंद आहे काय ? याची देखील पडताळणी केली जात आहे. सदर महिला ही मृत मुलाची आई असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे परंतु ओळख मात्र पटू शकलेली नाही. 


ओळखीचे पुरावे नाहीत 

घटनास्थळी महिलेची पर्स आणि अन्य काही साहित्य मिळाले आहे परंतु यावरून मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. सदर महिला आणि मुलगा हे पंढरपूर तालुक्यातील आहेत की बाहेरून आलेले आहेत याबाबत देखील काही माहिती मिळालेली नसून पोलीस या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधात आहेत. या घटनेने मात्र कालपासून पंढरपूर परिसरात खळबळ उडाली आहे.   


हे देखील वाचा >>>

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !