शोध न्यूज : भारतीय जनता पक्षाचे आमादार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला मोठा अपघात झाला असून आमदार गोरे हे जखमी झाले आहेत.
सातारा जिल्ह्यातील माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांची गाडी पन्नास फुट खोल कोसळली असून गाडीत आमदार गोरे यांच्यासह चौघेजण होते. पहाटे आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला हा अपघात झाला असून ते पुण्याकडून दहिवडीकडे जात असताना फलटण येथल बाणगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या अपघातात आ. गोरे यांच्यासह चौघेही जखमी झाले असून जखमींना बारामती येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर आ . जयकुमार गोरे यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल कानाय्त आले आहे. आ. गोरे हे जबर जखमी झाले असले तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावर लावण्यात आलेल्या तारा तोडून खाली कोसळली असल्याची माहिती मिळत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !