बारामती : सतत व्यस्त असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचा ताफा निघाला असतानाच त्यांच्यासमोर झालेला अपघात पाहताच वेगाने निघालेला ताफाही थांबला आणि अपघातग्रस्तांना मदतीसाठी अजितदादा धावले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे कडक शिस्तीबाबत प्रसिद्ध आहेत तसे ते मिश्कील भाषणाबाबतही ओळखले जातात. प्रत्येक कार्यक्रमाला आणि बैठकीला ते वेळेवर उपस्थित असतात पण कडक शिस्तीचे दादा आज प्रचंड व्यस्त असतानाही एका अपघातामुळे थांबले आणि त्यांनी त्यांनी थांबून जखमींना केवळ मदतच केली नाही तर काही वेळाने आठवणीने त्यांनी जखमींची चौकशी देखील केली. परवाच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी असाच आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली होती. आमदार रोहित पवार हे देखील पंढरपूर येथे गेले असताना त्यांनी गुरसाळेजवळ थांबून एका अपघातग्रस्त तरुणांला आपल्या ताफ्यातील वाहन देवून रुग्णालयात पाठवले होते. आज अजितदादा पवार यांनी असेच माणुसकीचे काम केले आहे.
बारामती दौऱ्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते त्यामुळे पवार यांचा आजचा बारामती दौरा हा अत्यंत व्यस्त होता. माळेगाव येथे पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या एका कार्यक्रमास उपस्थित राहून नंतर अजितदादा हे माळेगाव येथून बारामती येथील एका उद्घाटन समारंभास निघाले होते. याचवेळी शारदानगर परिसरात त्यांचा ताफा आलेला असताना त्यांना समोर एक अपघात झाल्याचे दिसले. माळेगाव कॉलनी येथे बारामती - नीरा मार्गावर हा अपघात (Accident) झालेला होता.
ताफा थांबवला !
समोर अपघात पाहताच अत्यंत व्यस्त असलेल्या अजित पवार यांनी आपला ताफा थांबवला. आपल्या ताफ्यातील सहकाऱ्यांना आदेश देत जखमींना ताबडतोब मदत करण्याच्या सूचना अजितदादानी दिल्या. आपल्या सहकाऱ्यांचे एक वाहन रिकामे केले आणि त्या वाहनातून जखमींना बारामतीच्या रुग्णालयात थांबवले. राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे संचालक संभाजी होळकर यांचे वाहन देवून त्यांना इतर वाहनात बसण्याची व्यवस्था केली.
जखमींची पुन्हा चौकशी !
घाई असतानाही काही काळ थांबून जखमींची व्यवस्था करणाऱ्या अजितदादांनी रुग्णालयात डॉक्टरांशी संपर्क करून उपचार करण्याच्या सूचना दिल्या आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमास निघून गेले. पुढील कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा अजितदादांनी डॉक्टरना फोन केला आणि जखमींची चौकशी केली. .
कडक आणि मुलायम !
नेहमी कडक दिसणाऱ्या अजितदादांचे मुलायम आणि संवेदनशील रूप आज पुन्हा बारामतीकरांनी अनुभवले. एक गाडी ठेवून आणि सहकारी मंडळीना सूचना देवून घाईत असलेले अजितदादा पुढे कार्यक्रमाला जाऊ शकले असते परंतु तसे न करता स्वत: थांबून त्यांनी सगळी व्यवस्था केली. (Ajit Pawar help to accident victims)रुग्णालयात फोन करून डॉक्टरांशी चर्चा केली आणि मगच पुढच्या कार्यक्रमाला गेले.
हे देखील वाचा :
- पोलिसाने घडवली मायलेकराची भेट !
- पंढरपूर तालुक्यात दरोड्याच्या आधीच पडल्या बेड्या !
- पंढरपूर तालुक्यात माजी सैनिकाचे घर फोडून चोरी !
- घरात घुसून मारू, खवळली बारामती !
- नामवंत किर्तनकाराच्या अश्लील व्हिडीओने भक्तांना धक्का !
- दिवसा नागाला मारले, रात्री नागीन चावली !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !