BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ मे, २०२२

महिलेच्या डोक्यावरून गेले मालट्रकचे चाक !

 


मोहोळ : कुरूल - मोहोळ रस्त्यावर काळजाचा ठोका चुकविणारा अपघात घडला असून या अपघातात मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक नागनाथ सोनवणे यांच्या कन्या ज्योत्स्ना यांचा मृत्यू झाला आहे. 


मोहोळ परिसराला अपघात परिसर म्हणण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली असून सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या परिसरात सतत अपघात होऊ लागले आहेत. आजचा अपघात मात्र कुरुल -  मोहोळ रस्त्यावर झाला असून हा अपघात अत्यंत थरारक आणि डोळ्यांना न पाहावणारा ठरला आहे.  कुरूल रस्त्यालगत सोनवणे टाईल्स नावाचे ज्योत्स्ना यांचे दुकान आहे. या दुकानातून त्या आपल्या स्कुटीवरून मोहोळच्या दिशेने निघाल्या असताना हा अपघात झाला आहे. कुरुल रस्त्यावरील महावितरण कार्यालयाच्या जवळ त्या स्कुटीवरून आल्या असताना भरधाव मालट्रकने त्यांना जोराची धडक दिली आणि ज्योत्स्ना स्कुटीवरून खाली पडल्या. त्यानंतर हा ट्रक थेट त्यांच्या डोक्याला चिरडून पुढे गेला. डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. 


मोहोळकडून कुरूलच्या दिशेने निघालेल्या मालट्रकने चुकीच्या दिशेने जावून स्कुटीला उडविल्याने अत्यंत थरारक अपघात झाला आणि डोक्यावरून ट्रकचा टायर गेल्यामुळे डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि मेंदू देखील बाहेर पडला. हे दृश्य पाहताना अंगावर काटा उभा राहात होता. पस्तीस वर्षीय ज्योत्स्ना यांच्या अपघाती निधनाने परिसरात प्रचंड दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला तेंव्हाही येथे मोठी गर्दी झाली होती. 


चालकाविरुद्ध गुन्हा 

मालट्रक (टी एन ५२ डी ६५१६ ) चालक विजयकांत तंगवेल याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण नागनाथ सोनवणे यांनी या अपघाताबाबत पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.   

    

हे देखील वाचा >>>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !