पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथे एक धक्कादायक घटना घडली होती. रामा अनिल धोत्रे (वय १९, रा. अनिलनगर, पंढरपूर), विकी मारुती जाधव (वय २०, रा. अनिलनगर, पंढरपूर), राज विलास मोहिते (वय १९, रा. अनिलनगर, पंढरपूर), आकाश ऊर्फ चम्या शिंदे (रा. कैकाडी मठामागे, पंढरपूर) हे शनिवारी वाळू काढण्यासाठी नदीच्या पात्रात गेले होते. यावेळी एक अत्यंत धक्कादायक घटना घडून गेली. नदीच्या बाजूला वाळू काढण्यासाठी पोखारण्यात आले होते आणि त्या खालील वाळू काढण्यासाठी रामा अनिल धोत्रे हा आत गेला होता. यावेळीच वाळूचा वरचा थर अचानक खाली कोसळला आणि तो थेट रामा धोत्रे याच्या अंगावर पडला. आत असलेला रामा त्याच वाळूखाली दाबला गेला आणि त्याच्या अंगावर मोठ्या प्रमाणत वाळू पडल्याने त्याला बाहेर निघता आले नाही.
राम अनिल धोत्रे या १९ वर्षे वयाच्या तरुणाचा वाळूत गुदमरून मृत्यू झाल्यानंतर पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. मृत्यू होऊ शकतो हे माहित असतानाही रामा धोत्रे याला वाळू उपसण्यासाठी नेल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आकाश बबन शिंदे (रा. आढीव विसावा, पंढरपूर), राज विलास मोहिते (रा. अनिलनगर, पंढरपूर), विकी उर्फ विकास मारुती जाधव (रा. अनिलनगर, पंढरपूर), बबलू वैरागकर, राजू नेमाडे (रा. पंढरपूर) यांच्या विरोधात ही मोठी कारवाई झाली आहे. यामुळे अन्य वाळू चोरांना देखील धडकी भरली आहे.
नको म्हणत असतानाही रामा अनिल धोत्रे याला वाळू उकराण्याचे काम करण्यासाठी नेण्यात आले, अशा प्रकरणी मृत्यू होऊ शकतो हे माहित असताना देखील त्याला वाळू उकरण्याचे काम करायला लावले आणि वाळू उकरण्याचे काम करीत असताना वाळू त्याच्या अंगावर पडून, पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. शिवाय त्यानंतर त्याला तेथेच सोडून सगळेजण पळून गेले त्यामुळे त्याच्या मृत्यूला हे सगळेच कारणीभूत आहेत अशा आशयाची फिर्याद मयत राम अनिल धोत्रे याची आई रुक्मिणी धोत्रे यांनी दिली. (A case has been registered against five sand thieves) या तक्रारीवरून पोलिसांनी सदर पाच जणांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हे प्रकरण त्यांच्यावर चांगलेच शेकले असून,अन्य वाळू चोरांना देखील धडकी भरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !