BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ सप्टें, २०२२

पंढरीत परप्रांतीयाला बेदम मारहाण !

 




शोध न्यूज : अर्धवट झोपेत असलेल्या एका परप्रांतियाला बेदम मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी पंढरपूर येथील चार जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


पंढरपूर येथे आलेल्या उत्तर प्रदेशातील व्यक्तीला कुंभार गल्ली येथे मारहाण झाल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील फत्तेपूर जिल्ह्यातील बिंदकी तालुक्यातील दर्यापूर येथून रामदिन सेवक निसाद या मोलमजुरी करून पोट भरण्यासाठी पंढरपूर येथे आलेला आहे. सद्या तो कुंभार गल्लीत रहात असून दिवसभर फिरून कागदी पुठ्ठे गोळा करून भंगार दुकानात विकून आपली उपजीविका करीत आहे. दिवसभर हे काम करून रामदिन हा घरात झोपलेला असताना घराच्या बाहेर त्याला कुणीतरी शिवीगाळ करीत असल्याचे ऐकू आले. काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी म्हणून ते बाहेर आले तर त्यालाच मारहाण झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


कुंभार गल्लीत तो रहात असलेल्या ठिकाणचे शेजारीच रहात असलेले अभिषेक कश्यप, सोनू कश्यप, अनीत कश्यप आणि विवेक कश्यप यांनी अत्यंत किरकोळ कारणावरून रामदिन यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कशासाठी शिव्या देताय? अशी विचारणा रामदिन याने केली तेंव्हा सोनू कश्यप याने शेंगदाणा ठेवण्याच्या पाटीचा स्टँड आणला आणि रामदिन याच्या डोक्यात घातला. याच्गा जोरदार मार रामदिन याला लागल्याने त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. (A migrant was brutally beaten in Pandharpur) यावेळी भांडणाचा आवाज ऐकून जवळच राहणारे दिनेश कश्यप, विनेश कश्यप, राममोहन कश्यप हे तेथे आले आणि त्यांनी हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांना न जुमानता चौघांनी मारहाण सुरूच ठेवली असे रामदिन यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीची कुंभार गल्ली परिसरात चर्चाही होऊ लागली आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !