BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ मे, २०२२

अबब ! राजकीय नेत्यांकडेच महावितरणची प्रचंड थकबाकी !

 


मुंबई : राज्यातील नेते, मंत्री, आमदार, खासदार यांच्याकडेच महावितरणची कोट्यावधी रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती थकीत वीज बिलांच्या यादीतून उघड झाली आहे. 


शेतकरी आणि सामान्य वीज ग्राहक यांना वीज बिले भरण्यासाठी महावितरणने सळो की पळो करून सोडले आहे. किरकोळ बिलांसाठी देखील वीज तोडण्यात येते. महावितरण (Mahavitaran) आर्थिक अडचणीत असल्याचा ढोल मोठमोठ्याने वाजवला जातो. विजेची बिले भरणे आणि बिल न भरणाऱ्या ग्राहकावर कारवाई करणे या दोन्ही बाबी आवश्यक आहेत पण कुठलाही कायदा आणि नियम हा केवळ सर्वसामान्यांनाच लागू असतो याची अनेक उदाहरणे समोर येत असतात. वीज कंपनी अडचणीत असताना आणि सामान्य शेतकरी अथवा वीज ग्राहक यांची वीज खंडित केली जाते मग राजकीय नेत्यांकडे लाखो रुपयांची थकबाकी असताना त्यांची वीज कशी अखंडित सुरु राहते याचे उत्तर शोधण्याचीही गरज नाही.

 
सामान्य ग्राहकांना विजेची बिले भरण्याचे आवाहन करणारे अनेक मंत्री, पक्षांचे वरिष्ठ नेते, आमदार, खासदार यांनीच कोट्यावधी रुपयांची बिले थकवून महावितरणला अडचणीत आणले आहे. कारवाई मात्र गरीब शेतकरी आणि सामान्य वीज ग्राहक यांच्यावरच होताना दिसत आहे. राज्यातील सर्वच भागातील लोकप्रतिनिधी यांच्याकडे काही हजार ते लाखो रुपयांची वीज बिलाची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. (Minister MLA has a huge amount of electricity bills) विजेची बिले थकवणाऱ्या  राजकीय  नेते आणि मंत्री यांची भली मोठ्ठी यादीच झाली आहे.


राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे ४ लाख वीज बिल थकले आहे  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, युवराज संभाजीराजे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार संग्राम थोपटे, माजी खासदार प्रतापराव जाधव, आमदार सुहास कादे, आमदार रवी राणा, आमदार वैभव नाईक, माजी मंत्री विजयकुमार गावित, माजी आमदार शिरीष चौधरी, मंत्री संदीपान भुमरे, खासदार रजनीताई पाटील, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार आशिष जयस्वाल, आमदार महेश शिंदे, माजी मंत्री सुरेश खाडे, सुमन सदाशिव खोत  आदींचा समावेश आहे. आमदार, खासदार मंत्री, आजी माजी नेते अशा ३२७ जणांचा यात समावेश आहे. 

 
सोलापूर जिल्हा 
माजी मंत्री सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रभाकर परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, आ. बबनदादा शिंदे, आ. संजय शिंदे यांचीही नावे वीज बिल थकित असल्याच्या यादीत आहेत. काही लोकप्रतिनिधींकडे एकापेक्षा अधिक जोडण्या असून काही जोडण्या त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहेत.


सर्वाधिक थकबाकी 
भारतीय जनता पक्षाचे माण (सातारा) येथील आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे तब्बल सात लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. थकबाकीदार असलेल्या लोकप्रतिनिधीत एकपेक्षा अधिक जोडण्या आहेत तर काही कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावाने आहेत. काही हजारापासून ते लाखो रुपयांपर्यंत त्यांनी  विजेची बिले थकवली आहेत पण कारवाई होताना मात्र दिसत नाही. 


सामान्य जनता त्रस्त 
महावितरण आर्थिक अडचणीत आलेली असताना त्यांच्या वसुली मोहिमेमुळे सामान्य ग्राहक मेटाकुटीला आला आहे. विजेची बिले भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही आणि थकीत बिलासाठी वीज कनेक्शन तोडले जात आहे. भारनियमनाचा देखील सामना करावा लागत आहे. (
Politicians have billions in electricity bills) राजकारणी मंडळीकडे मात्र कोट्यावधी रुपयांची थकबाकी असताना त्यांच्यावर कारवाई  होताना दिसत नाही की त्यांचा पुरवठा तोडला जात नाही असे विषम चित्र दिसत आहे.   



हे देखील वाचा >>>

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !