BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मे, २०२२

साथ जियेंगे साथ मरेंगे ! एकाच दिवशी पती पत्नीने घेतला जगाचा निरोप !

 



इंदापूर : 'साथ जियेंगे साथ मरेंगे' असे म्हटले जाते पण फार क्वचित व्यक्तींच्या बाबतीत हे सत्यात उतरते, इंदापूर तालुक्यात एकाच दिवशी पती पत्नीने या जगाचा असाच निरोप घेतला आणि ही उक्ती सार्थ ठरवली. 


सात जन्माची साथसोबत करण्याचा निश्चय करून लग्नाचे सात फेरे घेतले जातात. आयुष्यभर परस्परांच्या सुख दु:खात सहभागी होत संसाराचा गाडा ओढला जातो आणि संसाराचा गाडा ओढता ओढता दोघातील एक जण अचानक हे जग सोडून निघून जातो आणि एका जोडीदाराला मोठ्या कष्टाने पुढील आयुष्य काढावे लागते. जोडीदार गेल्याचा एवढा धक्का बसत असतो की या धक्क्यात मागे राहिलेले देखील अखेरचा श्वास घेतात. पतीचे निधन झाल्याने पत्नी आणि पत्नीचे निधन झाल्याने पती हा आघात सहन करू शकत नाही आणि ते देखील जगाचा निरोप घेतात. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडलेल्या असतात. दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार केले जातात. यावेळी साथ जियेंगे, साथ मरेंगे' ही उक्ती सार्थ ठरत असते. इंदापूर तालुक्यातील बावडा येथे देखील अशीच मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. 


इंदापूर तालुक्यातील बावडा येथील हनुमंत यशवंत कांबळे आणि त्यांच्या पत्नी हवई हनुमंत कांबळे यांचा विवाह झाल्यापासून दोघेही हातात हात घालून संसाराचा गाडा हाकत होते. मोठ्या हिमतीने संसाराचा गाडा चालवत त्यांनी आपला संसार फुलवला. त्यांना दोन मुले, तीन मुली सुना, नातवंडे असा संपन्न परिवार आहे. वारकरी सांप्रदायातील हनुमंत कांबळे हे धार्मिक होते. त्यांच्या धार्मिक वृत्तीमुळे त्यांनी सदाचारी जीवन जगले. त्यांच्या पत्नीचे वयाच्या ७७ व्या वर्षी पहाटेच्या सुमारास निधन झाले. धार्मिक प्रवृत्तीच्या हनुमंत कांबळे यांना मोठा धक्का बसला. कुटुंब, नातेवाईक आणि गावकरी यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. घरात शोकाचे वातावरण होते तर हनुमंत कांबळे यांना कमालीचे दु:ख झाले होते. सकाळी पत्नीचे निधन झाले आणि अंत्यसंस्कार केले गेले, सायंकाळी सहा वाजता हनुमंत कांबळे ( वय ८२) यांनी देखील अखेरचा श्वास आणि जगाचा निरोप घेतला. (Husband and wife died on the same day) 

 
ग्रामस्थातून हळहळ
निष्ठेने आयुष्याची साथ संगत केल्यानंतर एकाच दिवशी एका पाठोपाठ पती पत्नींनी जगाचा निरोप घेतल्याने कुटुंब, नातेवाईक तर शोकाकुल आहेतच पण गावकऱ्यातून देखील प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हनुमंत कांबळे हे वारकरी संप्रदायातील सदाचारी व्यक्ती होती. आपल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून त्यांनीही जगाचा निरोप घेतला. 


हे देखील वाचा :>

         


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !