BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मे, २०२२

एकशे बावीस वर्षातला तापमानाचा उच्चांक !


 


नवी दिल्ली : नुकताच संपलेल्या एप्रिल महिन्याने तापमानातील उच्चांक गाठला असून गेल्या १२२ वर्षात पहिल्यांदाच हे तापमान वाढले असल्याचे समोर आले आहे. 


पावसाळा चांगला झाल्यानंतर उन्हाळ्याची तीव्रता काहीशी कमी होईल असे काहीना वाटत होते पण उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच तीव्रता वाढत गेली आणि अधून मधून अवकाळी पावसासह गारपीठ होत राहिली आणि याच वेळी राज्यातील काही भागात मात्र उष्णतेची लाट येत राहिली आहे. राज्यात उष्माघाताने एका महिन्यात २१ व्यक्तींचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद राज्याच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे. राज्यातील विविध विभागात तापमान वाढतेच असून पारा वाढतचा चालला आहे. मे महिन्याचा आज पहिला दिवस असून अजून संपूर्ण महिना शिल्लक आहे आणि उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे त्यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच एप्रिल महिन्यातील तापमान गेल्या १२२ वर्षातील सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. 


उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात एप्रिल महिन्यातील तपमान हे वर्ष १९०० च्या  नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे आणि या महिन्यात देखील उत्तर आणि पश्चिम भारतात तपमान सामान्यापेक्षा अधिकच राहणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. देशातील उर्वरित भागातील तापमान मार्च आणि एप्रिल महिन्याएवढेच राहील असे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.  या महिन्यात उत्तर - पश्चिम, मध्य आणि पूर्व आणि ईशान्य भारताच्या बऱ्याचशा भागात किमान तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे तर राजस्थान, गुजरात, दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाखमध्ये उष्ण वारे वाहतील. 


१२२ वर्षातील उच्चांक 

सन १९०० नंतर २०२२ मधील एप्रिल महिना हा भारतातील चौथा आणि सर्वाधिक उष्ण असा म्हणा ठरला आहे.  म्हणजेच गेल्या १२२ वर्षातील सर्वाधिक तापमान यावर्षीच्या एप्रिल महिन्यात होते. भारताच्या उत्तर - पश्चिम आणि मध्य भागातील हा उच्चांक आहे. पश्चिम भारतातील अनेक भागातील नियमित तापमान ४२ अंशापेक्षा अधिक असते. 


मे अखेरीस मान्सून !

मे महिन्याच्या मध्यापासून गडगडाटी वादळे येण्याची शक्यता असून दक्षिण, मध्य आणि पूर्व भारतात मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल परंतु या महिन्यात मूळ पाऊस कमी असेल. मे महिन्याच्या अखेरीस मान्सून केरळ मध्ये दाखल होण्याची अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 


२१ व्यक्तींचा मृत्यू ! 

मार्च महिन्यात उष्माघाताचे प्रकार वाढीस लागले आणि उष्माघाताने ३०० पेक्षा अधिक लोक आजारी पडले तर २१ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेपासून दक्षता घेण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत होते पण तरीही कष्टकरी माणसाला उन्हात काम केल्याशिवाय पर्याय नसतो आणि अशा घटना घडतात. 


विविध जिल्ह्यात परिणाम 

उष्माघाताने मृत्यू झालेल्या २१ नागरिकात नागपूरमधील ७ जणांचा समावेश आहे. नागपूर विभागात उष्णतेशी संबंधित रुग्णाची संख्या २६२ वर गेली आहे. जळगाव जिल्ह्यात  ४, अकोला - ३, जालना - २ आणि अमरावती, उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात प्रत्येकी एका उष्माघाताच्या बळींची नोंद झाली आहे. मागील वर्षी उष्माघाताने एकही बळी गेला नव्हता परंतु २०१६ ते २०१९ या कालावधीत ४३ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद आहे. 


हे देखील वाचा :>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !