BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मे, २०२२

महावितरणकडून ग्राहकांना आणखी एक अतिरिक्त शॉक !

✪ जय महाराष्ट्र ! ✪ ✪➤> महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! - शोध न्यूज परिवार ✪➤ ✪

 



वाढत्या विद्युत बिलाने ग्राहक हैराण झालेला असतानाच आता पुन्हा एक शॉक महावितरणने दिला असून सुरक्षा ठेवीच्या नावाने ग्राहकांना बिले (Mahavitaran) देण्यात येऊ लागली आहेत त्यामुळे वीज ग्राहकाचा पार ऐन उन्हाळ्यात वाढू लागला आहे. 


वाढत्या महागाईचे  चटके सामान्य माणसाला असह्य झालेले आहेत, गॅस, पेट्रोल, डिझेल यांचे भाव सतत भडकत आहेत, बाजारात दैनंदिन आवश्यक असणाऱ्या आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर देखील प्रचंड महाग होत आहेत. विजेच्या बिलात वीज वापरापेक्षा अन्य आकार बिलाचा आकडा फुगवत चालला आहे.. कोरोनाचे संकट दोन वर्षे ठाण मांडून बसले आणि उद्योग धंदे बंद पडले, गरिबांच्या हाताला काम मिळाले नसल्याने रोजगारापासून वंचित राहावे लागले. कोरोनाच्या गाळात रुतलेले आर्थिक चक्र आता कुठे बाहेर निघण्याच्या स्थितीत आहे तोपर्यंत महागाईची जबरदस्त लाथ बसू लागली आहे. प्रत्येक बाबतीत वाढती महागाई पाहून सामान्यांचे पिचलेले कंबरडे मोडून पडू लागले आहे आणि अशातच महावितरण एकेक शॉक देत आहे. 


विजेचे नियमित बिल भरायला पैसे नसल्याने महावितरण कित्येक ग्राहकांचे वीज कनेक्शन कापत आहे आणि ऐन उन्हाळ्याच्या दिवसातही उकाड्यात, अंधारात बसण्याची वेळ ग्राहकावर येत असताना महावितरणने सुरक्षा ठेवीची बिले ग्राहकांना द्यायला सुरुवात केली आहे. अनेक ग्राहकांच्या हाती यावेळी दोन बिले पडली आहेत. नियमित बिलांच्या सोबत सुरक्षा ठेवीचे बिल देखील देण्यात आले आहे. हा ग्राहकांना अतिरिक्त शॉक ठरला आहे. वीज बिल भरायला पैसे नसताना सुरक्षा ठेव भरण्यासाठी पैसे आणायचा कुठून हा प्रश्न सामान्य वीज ग्राहकांना पडलेला आहे.  अतिरिक्त सुरक्षा ठेव पूर्वीपासूनच महावितरणकडे पडलेली आहे. यापूर्वी महावितरणने ग्राहकाकडून सुरक्षा ठेव घेतलेली देखील आहे तरीही आणखी सुरक्षा ठेवीची बिले ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहेत. त्यामुळे वीज ग्राहक हवालदिल झाले आहेत. 


वीज दर विनिमय २०१९ नुसार महावितरणने वीज दर वाढवून मिळावेत म्हणून विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव दिला होता आणि आयोगाने २०२० ते २०२४-२५ या पाच वर्षासाठी बहुवर्षीय वीज दराचा आदेश जारी केला. महावितरणने विविध ग्राहक वर्गवारीसाठी १ एप्रिल २०२० पासून लागू असलेले वीज दर निश्चित केले. १ एप्रिल २०२२ पासून लागू असलेल्या दराप्रमाणे सद्या विजेच्या बिलांची आकारणी केली जात आहे आणि त्यासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. (Another 'shock' to MSEDCL customers) महावितरणला यातून कोटयवधी रुपये मिळणार आहेत पण ग्राहक मेटाकुटीला येत आहे याचा विचार होताना दिसत नाही.   


अशी असते सुरक्षा ठेव 
वीज सेवा पुरविण्यासाठी महावितरण ग्राहकाकडून सुरक्षा ठेव घेत असते, नवी जोडणी देताना ही सुरक्षा ठेव अल्प असते परंतु नंतर दरवर्षी वापरल्या जात असलेल्या विजेची एकूण सरासरी सुरक्षा ठेव (Security Deposit) रकमेपेक्षा दहा टक्क्याहून अधिक असेल तर मूळ सुरक्षा ठेव आणि वार्षिक सरासरी बिळात दहा टक्क्याने वाढली जाते आणि तेवढी सुरक्षा ठेव ग्राहकाकडून वसूल करण्यात येत असते. 


कायद्यात तरतूद !
प्रत्येक ग्राहकाकडून सुरक्षा ठेव घेतली जाते आणि अशी ठेव घेण्याचेही तरतूद कायद्यातच करण्यात आलेली आहे. सदर सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना प्रचलित दरानुसार महावितरणकडून व्याज देखील दिले जाते. वार्षिक वीज वापराच्या सरसरीत जर सुरक्षा ठेव रकमेपेक्षा दहा टक्क्याहून अधिक वाढ झालेली असेल तर नियमानुसार वाढ सुरक्षा ठेव वसूल केली जाते. 


हे देखील वाचा :> 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !