BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मे, २०२२

चिंता वाढली, वाढत्या उष्णतेबाबत राज्यांना अलर्ट !


मुंबई : वाढत्या उष्णतेने राज्यात अनेक बळी गेले असताना आणखी उष्माघाताचा धोका असल्याबाबत आता केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट केले असल्याने चिंता वाढली आहे. 


यावर्षी देशात उच्चांकी तापमान वाढत असून आत्तापर्यंत राज्यात देखील उष्णता आणि  उष्माघाताचे बळी जात आहेत. दोन महिन्यात राज्यात उष्माघाताचे २५ बळी गेले आहेत. देशात एप्रिल महिन्यात गेल्या १२२ वर्षातील सर्वाधिक तापमान नोंदले गेले आहे. गेल्या काही आठवड्यापासून विक्रमी तापमानामुळे काही राज्यातील नागरिक हैराण झालेले आहेत. त्यातच सद्या सुरु असलेला मे महिना आणखी कडक उष्णतेचा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक राज्यात कमाल तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सियस पर्यंत पोहोचले आहे त्यामुळे केंद्र शासनाने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार वाढत्या उष्म्यापासून विशेष खबरदारी घेण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिलेल्या आहेत. 


वाढत्या उष्णतेचा नागरिकांना गंभीर त्रास होण्याची बीती असल्याने केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना अलर्ट दिलेला आहे. आगामी काळात उष्म्यासंबंधित आजार उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक जिल्हाय्च्या स्तरावर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे.   हवामान विभाग आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राद्वारे उष्म्यासंदर्भात दररोज जारी करण्यात येणारे अलर्ट जिल्हा स्तरापर्यंत पोहोचविले जावेत, (Warning to states about rising heat) उष्म्यासंदर्भात राष्ट्रीय कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर भर देण्यात यावा तसेच आरोग्य केंद्रावरील सुविधांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येऊन आरोग्य केंद्रावर पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 


डोळ्यांची काळजी घ्या 

डोळ्यांना खाज सुटणे, लालसरपणा आणि जळजळ होणे अशा प्रकरचा त्रास वाढत्या उष्णतेने होऊ शकतो त्यामुळे या कालावधीत डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी दिलेला आहे. या बाबीकडे गंभीरपणे न पाहिल्यास आणि काळजी न घेतल्या डोळ्यांचा त्रास बळावू शकतो असेही सांगण्यात आले आहे. 


मुलांचे आजार वाढले 

मुलांचे आजारपण वाढू लागले असून त्याला उष्णता हे प्रमुख कारण असल्याचे बालरोग तज्ञ डॉ. संपदा तांबोळकर यांनी सांगितले आहे. तापाने फणफणलेली मुले मोठ्या संख्येने रुग्णालयात येऊ लागली आहेत. नियमित औषधांनी दीड दोन दिवसात ताप उतरणारा ताप पाच ते सहा दिवसही उतरत नसल्याचे सद्या दिसून येवू लागले आहे त्यामुळे पालक देखील चिंताक्रांत होऊ लागले आहेत.


उष्णतेच्या लाटेचा इशारा 

भारतीय हवामान विभागाने सर्व राज्यांसाठी  पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला गेला आहे. राज्यांच्या आरोग्य विभागांनी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत स्थानिक पातळीवर स्वयंसेवकांची संख्या वाढवावी आणि त्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.  


हे देखील वाचा : >>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !