BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० एप्रि, २०२२

सोलापूर बँकेवर तुम्हाला 'मालक' म्हणून पाठवले होते काय ? अजितदादांचा सवाल !


मोहोळ : 'सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तुम्हाला विश्वस्त म्हणून पाठवले होते, मालक म्हणून नाही ' अशा परखड भाषेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बँकेच्या तत्कालीन संचालकांना जाहीरपणे झापले. 


आज मोहोळ तालुक्यातील अनगर येथील शेतकरी मेळाव्यासाठी राज्याचे उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित राहिले होते. अजित पवार यांचे प्रत्येक जिल्ह्यातील राजकारणावर आणि अन्य घडामोडींवर बारकाईने लक्ष असते हे या आधीही अनेकदा दिसून आले आहे तसेच एखाद्या चुकीच्या गोष्टीवर बोलताना ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. सामान्य कार्यकर्ता असो की सहकारी मंत्री, नेता असो, ते जाहीरपणे पाणउतारा करताना मागे पुढे पाहत नाहीत. स्पष्टवक्ते म्हणून राज्यभर त्यांचा परिचय आहे आणि काही वेळा त्यांच्या या स्पष्ट बोलण्यामुळे ते अडचणीत देखील आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 'त्या' पुढारी मंडळीना आज अनगर येथे अजितदादा यांनी जाहीर झापले. 


सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सद्या प्रशासक आहे शिवाय ही बँक मोठ्या अडचणीत आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाची असलेली बँक अडचणीत आली असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या बँकेच्या विषयावर आज अजितदादा यांनी तत्कालीन संचालक मंडळावर कोरडे ओढले. 'सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत तुम्हाला विश्वस्त म्हणून पाठवले होते, मालक म्हणून नाही, ज्या त्या भागातील नेत्यांनी त्यांच्या बांका, कारखाने चांगल्या पद्धतीने चालवाव्यात ना ! त्या चालविण्यासाठी मी आणि शरद पवारांनी यायचे काय ? असा सवाल त्यांनी अत्यंत तिखटपणे आणि जाहीरपणे बोलताना उपस्थित केला. (Ajit Pawar is angry with the local leader) बँकेच्या विषयी बोलताना त्यांचा राग स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

 

'तुमच्या सहकारी संस्था तुम्हीच चांगल्या पद्धतीने चालवायला पाहिजेत, माझ्या ताब्यातील संस्था मी चांगल्या पद्धतीने चालवतो म्हणूनच महाराष्ट्रात गडचिरोली असो किंवा मोहोळ असो, कुठेही ठोकून बोलतो, आमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आम्ही चांगली चालवतो मग सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळीना त्यांची बँक का चांगली चालवता येत नाही ? बँकेला कुणी अडचणीत आणले? कुणामुळे बँक अडचणीत आली ? मी बोललो की म्हणतात, लय बोलतो. पण खरं आहे तेच बोलतोय ना ? (Solapur District Central Co-operative Bank) बँक अडचणीत येण्यात शेतकऱ्यांची काहीच चूक नाही संचालक मंडळ हेच जबाबदार आहे असे परखडपणे अजितदादा पवार यांनी जाहीर भाषणात सांगितले. 


अजितदादांकडून शुभेच्छा !

दरम्यान उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे युगपुरुष या भूमीत जन्मले आहेत. रयतेचे राज्य, स्वराज्य स्थापन करून राज्यकारभाराचा आदर्श त्यांनी घालून दिला. या महामानवांनी दिलेला विचार, दाखवलेल्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न महाराष्ट्राने, राज्य सरकारने नेहमीच केला आहे. महाराष्ट्राची, महाराष्ट्रवासियांची एकी कुणीही तोडू शकत नाहीत अशी भावना व्यक्त करीत त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.  



हे देखील वाचा .. खालील बातमीला टच करा !

  अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !