मोहोळ : सोलापूर- पुणे महामार्गावर बंद पडलेल्या ट्रक आणि रुग्णवाहिका यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील वडाची वाडी हद्दीत हा अपघात झाला. एक मालट्रक (केए ४१ ए ४२९३) हा मोहोळकडून सोलापूरच्या दिशेने निघालेला होता परंतु तो बंद पडल्याने एका ढाब्यासमोर उभा होता. पाठीमागून येत असलेली आणि सोलापूरच्या दिशेने निघालेली रुग्णवाहिका ( एम एच ४ जे यु ४७४२) उभ्या ट्रकला पाठीमागून जोराने धडकली. या अपघातात रुग्नावाहीकेच्या पुढच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे परंतु झालेली धडक ही अत्यंत थरारक होती. रुग्णवाहिकेची समोरची बाजू ट्रकच्या मागच्या बाजूने खाली गेली होती.
सदर अपघातात सुहास मुकुंद हौसलमल (रा. वाशी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य पाच जण या अपघातात जखमी झाले आहेत. डॉ. शैलेश चौधरी (बेलापूर), दत्ता अर्जुन खरटमल आणि ज्योती दत्ता खरटमल ( हैद्राबाद ), विशाल सरदार (वाशी), जयआप्प्पा एकनाथ कावळे (कल्याण) हे पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- ⭕ पंढरीत अपघात, प्रतिष्ठित व्यापारी ठार !
- ⭕पंढरीत गुणरत्न सदावर्तेविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची प्रतीक्षा !
- ⭕ तडीपार गुंडाचा सोलापूर पोलिसावर हल्ला !!
- ⭕ सोलापूर महावितरण अधिकारी सापडला रंगेहात !
- ⭕ सोलापूर जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल !
- ⭕ चिमुटभर तंबाखुसाठी साखर कारखाना कामगाराचा खून !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !