BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ एप्रि, २०२२

आजपासून सोलापूर जिल्ह्यातील शाळांच्या वेळात पुन्हा बदल !

 



सोलापूर : वाढत्या तापमानामुळे आजपासून सोलापूर जिल्ह्यातील प्रथाकिम शाळांच्या वेळा पुन्हा बदलल्या असून आता या शाळा सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच भरणार आहेत. 


कोरोनामुळे दोन वर्षांपासून शाळांचे दरवाजे बंद राहिले आणि यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शाळेत जाण्याच्या वयात मुले घरात कोंडलेल्या अवस्थेत दोन वर्ष राहिली. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्विकारण्यात आला होता परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नव्हता त्यामुळे ते या शिक्षणापासूनही वंचित राहिले आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळ्यात देखील शाळा सुरु ठेवण्याबाबत निर्णय झाला पण यावर्षी उन्हाळा अधिकच  कडक असल्याने हा पर्याय देखील अडचणीचा ठरू लागला. वाढते तापमान आणि उष्णतेची लाट यामुळे राज्यात उष्माघाताचे काही बळी गेले आहेत त्यामुळे एप्रिल  महिन्यातील शाळेला विरोध होत राहिला आहे. 


फेब्रुवारीत शाळा सुरु झाल्यानंतर पहिली ते अकरावीचे वर्ग पूर्णवेळ आणि एप्रिलअखेरपर्यंत सुरु ठेवण्याबाबत आदेश काढण्यात आले, शंभर टक्के उपस्थिती असावी असेही या आदेशात नमूद करण्यात आले होते, पण या निर्णयाला विरोध होत राहिला. उन्हाळ्याच्या दिवसात पूर्ण वेळ शाळा अडचणीची ठरत होती आणि विरोध वाढत होता त्यामुळे या आदेशात बदल करून सकाळी ७.३० ते १२.३० शाळांची वेळ करण्यात आली. आता त्यात पुन्हा बदल करण्यात आला असून या शाळा आता आजपासून ११ वाजेपर्यंतच भरणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे हा निर्णय घेतला आहे.  


पूर्वीच्या आदेशात बदल करून सकाळी ११ वाजेपर्यंतच शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा आदेश आजपासूनच लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा सकाळी ७.१० ते ११ वाजेपर्यंत भरविल्या जातील. त्यामुळे वाढत्या तापमानात छोट्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. दुपारी साडे बारा वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाताना ऐन कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागत होता. (Changes in school hours in Solapur district) आता नव्या निर्णयामुळे उन्हाचा कडाका वाढण्याआधीच विद्यार्थी घरी पोहोचणार आहेत. 


हे देखील वाचा :   (बातमीवर क्लिक करा )






 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !