BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ एप्रि, २०२२

सोलापूर पोलिसांवर हल्ला, भर रस्त्यावर हंगामा !

 



सोलापूर : तडीपार गुंडांवर कारवाई करीत असताना पोलिसावर गुंडाच्या कुटुंबीयांनी जोरदार हल्ला केल्याची घटना सोलापूर (Solapur Crime) येथे घडली असून पोलिसांनी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


गुन्हेगारांची हिम्मत अलीकडे अधिकच वाढू लागली असून पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात तसेच वेळापूर येथेही अशी घटना घडली होती. पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होण्याच्या काही घटना या आधीही घडल्या असताना आता पुन्हा येथे असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. तडीपार असलेल्या बॉबी शिंदे याला अटक करण्याप्रसंगी हा प्रकार घडला आणि या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना सोलापुरातून तडीपार करण्यात येत असून अलीकडेच चौघांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. संघटितरित्या टोळी प्रस्थापित करून टोळीच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या बाळे येथील चौघावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. अशाच प्रकारे  सचिन उर्फ बॉबी शिंदे याला तडीपार करण्यात आले होते. तडीपार असताना देखील सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तो दिसून आला. पोलिसांचे लक्ष जाताच पोलिसांनी त्याला पकडले आणि पोलीस ठाण्यात घेऊन निघाले असता शिंदे याच्या कुटुंबीयांनी जोरदार विरोध केला आणि पोलिसांना प्रतिकार सुरु केला. 

पोलीस बॉबी शिंदे याला घेऊन निघालेले असताना त्याला घेऊन जाऊ नका म्हणत पोलिसांशी हुज्जत घालू लागले. पोलीस नाईक रविराज काळे आणि पोलीस कर्मचारी पाटील हे तसेच बॉबी शिंदे याला कारवाईसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते परंतु कुटुंबीय त्याला विरोध करीत होते. यातच पोलीस आणि कुटुंबीय यांच्यात झटपट सुरु झाली. पोलिसांची गच्ची पकडून ओढू लागले तर एकाने पोलिसांच्या हाताचा जोरदार चावा देखील घेतला. एवढेच नाही तर, 'बॉबीला सोडून दे नाहीतर बघ ' अशा धमक्या देत पोलिसांना शिवीगाळ देखील करण्यात आली. पोलीस आणि बॉबी शिंदे याचे कुटुंबीय यांच्यात बराच वेळ हा प्रकार सुरु होता आणि डॉ. आंबेडकर चौकात   बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली होती. 

गुन्हा दाखल !
दोन पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलिसांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यात सचिन उर्फ बॉबी शिंदे, कीर्ती शिंदे, सुलोचना शिंदे, दीक्षा वाघमारे, गुड्डी शिंदे यांच्यासह अन्य दोन अनोळखी इसम यांच्यावर हा गुन्हा (Attack on police in Solapur) दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक रविराज काळे यांनी ही फिर्याद दिली आहे.

हे देखील वाचा :   (बातमीवर क्लिक करा )






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !