BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ एप्रि, २०२२

चिमुटभर तंबाखुसाठी झाला कामगाराचा खून !

 



श्रीपूर : चिमुटभर तंबाखू देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या एका कामगाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना (Solapur Crime) घडलेली असून मयत कामगार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता असल्याचे समजते.

 
हल्ली माणसांचा जीव किती स्वस्त झालाय हेच या घटनेतून दिसून येते. कुठल्यातरी पण मोठ्या वैमनस्यातून खून होण्याच्या घटना घडतात तर कधी पैशाच्या हव्यासातून अशा घटना घडल्याचे समोर येते. एखाद्याचा जीव घेण्यासाठी कुणी सरसावतो तर त्याला कारण देखील तसेच मोठे असते पण माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे केवळ चिमुटभर तंबाखुसाठी खून होण्याची घटना घडली असल्याने या घटनेची चर्चा होऊ लागली आहे. कुणी अनोळखी परस्परांना भेटले तरी तंबाखूची देवघेव होते, तंबाखूमुळे नव्या ओळखी देखील होतात असे ग्रामीण भागात म्हटले जाते. रस्त्यावरील वाटसरूला देखील तंबाखू मागितली जाते आणि परिचय नसला तरी दोघे गप्पा मारत तंबाखू मळत उभे असतात. श्रीपूर मध्ये मात्र याच तंबाखूने एकाचा जीव घेतला (Murder) गेला. 


मयत कल्याण लांडगे यांचा मुलगा करण लांडगे याने याबाबत अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार म्हाळुंग येथील बाबासाहेब भोसले आणि कल्याण लांडगे यांच्यात तंबाखूच्या कारणावरून वाद झाल्याचे म्हटले आहे. श्रीपूर येथे शक्ती वाईन्स समोर कल्याण लांडगे उभे असताना तेथे बाबासाहेब भोसले आला आणि त्याने कल्याण लांडगे यांना तंबाखूची मागणी केली. कल्याण यांनी तंबाखू देण्यास नकार दिला आणि यावरूनच दोघात वादावादी सुरु झाली.  हा वाद वाढत गेला आणि बाबासाहेब भोसले याने लांडगे यांना लाथाबुक्क्यांनी आणि चप्पलने मारहाण केली असे सदर फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीचा हा प्रकार घडल्यानंतर कल्याण लांडगे हे आपल्या घरी आले आणि त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. 


या मारहाणीत कल्याण लांडगे यांना जबर मार लागलेला होता. त्यांचा चेहरा काळा पडलेला होता तर माराहाणीच्या वेळेस जीभ त्यांच्याच दाताखाली सापडल्याने काळी पडली होती. कपाळावर आणि चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा देखील दिसत होत्या. झालेल्या मारहाणीमुळे त्यांना त्रास होत होता आणि यातच त्यांची तब्येत बिघडली. त्यांना लगेच उपचारासाठी अकलूज येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेबाबत मुलगा करण लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलिसांनी महाळुंग येथील बाबासाहेब भोसले याच्याविरोधात खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 


मयत कल्याण लांडगे हे पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर कामगार होते आणि वंचित बहुजन आघाडीचे ते कार्यकर्ते होते अशी माहिती मिळत आहे. लांडगे आणि बाबासाहेब भोसले यांच्यात निवडणुकीवरून निर्माण झालेले वैमनस्य होते असे देखील समजते. केवळ तंबाखू मागण्याच्या कारणावरून खुनाची घटना समोर आल्याने माळशिरस तालुक्यात खळबळ उडालेली असून या प्रकरणी (Murder of Sugar factory worker due to tobacco) अकलूज पोलीस अधिक तपास करीत आहेत.   

हे देखील वाचा :   (बातमीवर क्लिक करा )




 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !      




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !