BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० एप्रि, २०२२

पंढरपूर तालुक्यातून कुख्यात दरोडेखोरास अटक !

 



पंढरपूर : पोलिसांना हवा असलेला कुख्यात दरोडोखोर अखेर पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथे सापडला असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून गजाआड केले आहे. 


सोलापूर जिल्ह्यात चोरी, घरफोडी, दरोडे अशा प्रकारचे गुन्हे वाढीस लागले असून गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. सोलापूर जिल्ह्यातील घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना  जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गुन्हे करून फरार असलेल्या सराईत गुन्हेगांचा शोध पोलीस घेत असून त्यांना यशही येत आहे. काही दिवसांपूर्वीच आंतरराज्य गुन्हेगार (Interstate criminals arrested at Pandharpur) यलप्पा उर्फ खल्या अद्रक शिंदे याला पंढरपूर येथून तीन रस्ता परिसरातून अटक केली होती आणि आता आणखी एक कुख्यात दरोडेखोर पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथून पकडला आहे. 


मंगळवेढा येथील दामाजीनगर आणि नागणेवाडी येथील दोन दरोड्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांना हवा असलेला नारायण शितोल्या  भोसले हा कुख्यात दरोडेखोर पोलिसांना हुलकावण्या देत होता. दरोड्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत होते. कर्नाटक राज्यातून रवी बालूराव भोसले, नजीर झुंबर पवार, दीपक सावंत, दिनकर पवार यांना जेरबंद करून त्यांच्याकडून दरोड्यांतील ४७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता पण या दरोड्यातील मुख्य सूत्रधार असलेला नारायण शितोल्या भोसले हा मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. 


मंगळवेढा पोलीस नारायण भोसले याच्या मागावर असतानाच त्यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली आणि त्या माहितीच्या आधारे पोलीस पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथे पोहोचले. मोठ्या कौशल्याने पोलसांनी नेपतगाव शिवारातून भोसले याला पकडले. दरोड्यात त्याच्या वाटणीला आलेले सोन्याचे दागिने, मोबाईल असा १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल देखील त्याच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. (Wanted robber arrested in Pandharpur taluka) या यशस्वी कामगिरीबद्धल मंगळवेढा पोलिसांचे कौतुक होऊ आहे. 


दुसरी कारवाई !

मंगळवेढा येथील चोरी प्रकरणी पंढरीत केकेली गेल्या काही दिवसातील ही दुसरी कारवाई आहे. यलप्पा उर्फ खल्या अद्रक शिंदे (वय ४०) या सराईत गुन्हेगारास तीन रस्ता येथून काही दिवसांपूर्वीच जेरबंद केले होते. मूळचा कर्नाटक राज्यातील यलप्पा शिंदे हा पंढरपूर येथील तीन रस्ता परिसरात मोकळ्या मैदानात राहत होता. त्यानेही काही दिवस पोलिसांना चकवा दिला पण पोलिसांनी त्याची माहिती काढून त्यालाही गजाआड केले होते.  


हे देखील वाचा :   (बातमीवर क्लिक करा )




 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !   

      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !