पंढरपूर : टिप्परने धडक दिल्यामुळे पंढरीतील वांगीकर इलेक्ट्रोनिक्सचे प्रतिष्ठित व्यापारी रमेश वांगीकर यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शहरातील भक्ती मार्गावर संत गाडगे महाराज चौकात एका टिप्परने दुचाकीवर निघालेल्या रमेश वांगीकर यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की वांगीकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. संत गाडगे महाराज चौकातून रमेश वांगीकर हे जात असताना टिपर (एम एच १३ डी क्यू २७०८) त्यांना धडक दिली. या धडकेने ते दुचाकीसह खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना घडताच परिसरातील नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
वांगीकर हे पंढरपूर शहरातील प्रतिष्टीत व्यापारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या अपघाताने पंढरपूर शहरात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गातून हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. शहरात देखील अपघात होउ लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- ⭕ पंढरीत गुणरत्न सदावर्तेविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची प्रतीक्षा !
- ⭕ तडीपार गुंडाचा सोलापूर पोलिसावर हल्ला !!
- ⭕ सोलापूर महावितरण अधिकारी सापडला रंगेहात !
- ⭕ सोलापूर जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल !
- ⭕ चिमुटभर तंबाखुसाठी साखर कारखाना कामगाराचा खून !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !