BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ एप्रि, २०२२

महावितरण अधिकाऱ्यास लाच प्रकरणी अटक !

 



सोलापूर : महावितरणचा सहाय्यक विद्युत निरीक्षक फैजुलअली मुल्ला या अधिकाऱ्यास पंधरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडला ( Solapur Crime) असून त्याला अटक करण्यात आली आहे. 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सरकारी मासे रोज सापडत असले तरी लाच मागण्याचे प्रकार कमी होताना दिसत नाहीत. शिपायापासून साहेबापर्यंत अनेकजण लाचेच्या गोत्यात आले आहेत. महसूल, पोलीस हे सरकारी विभाग लाच प्रकरणात आघाडीवर आहेत पण जलसंपदा, महावितरण या विभागात देखील ही लागण मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. महावितरणचे अनेक अधिकारी यापूर्वी देखील लाच प्रकरणी गोत्यात आलेले आहेत. भला मोठा पगार असतानाही काही किरकोळ रकमेच्या लालचेपोटी तुरुंगात जावे लागते तरी देखील यांची खोड कमी होत नाही. महावितरणचा (MSEDEL Solapur Kolhapur ) सहाय्यक विद्युत निरीक्षक असाच गोत्यात आला आणि एक ठेकेदाराने त्याला जबर शॉक दिला. 

महावितरण ठेकेदारीचा परवाना देण्यासाठी सहाय्यक विद्युत निरीक्षक (वर्ग - २) फैजूलअली मेहबूब मुल्ला ३२  हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. पूर्वी केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून दहा हजार आणि नवीन परवान्यासाठी २२ हजार रुपयांची लाच मुल्ला याने मागितली होती. महावितरणकडे वीज दुरुस्ती आणि अन्य कामासाठी खाजगी ठेकेदार नेमण्यात येतात आणि त्यासाठी महावितरणकडून दोन परवान्याची आवश्यकता असते. सुरुवातीला विद्युत पर्यवेक्षक म्हणून परवाना मिळतो आणि तानान्त्र काही दिवसांनी अधिकृत ठेकेदार म्हणून महावितरणकडून परवाना दिला जातो. असा परवाना देण्याचे काम मुल्ला याच्याकडे होते. मुल्लाकडे सोलापूर आणि कोल्हापूर अशा दोन ठिकाणाचा कार्यभार आहे. 

महावितरणकडून संबंधित तक्रारदाराने पहिला परवाना मिळवला होता पण त्याच्या बदल्यात मुल्ला याला काहीच रक्कम दिलेली नव्हती आणि आता दुसरा परवाना प्राप्त करायचा होता त्यामुळे मुल्ला याने पहिल्या कामाचे आणि आता दुसऱ्या परवान्यासाठी अशी ३२ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदारास ही लाच देणे मान्य नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून आपली तक्रार दिली. या तक्रारीवर पडताळणी करून सापळा लावण्यात आला. यावेळी ३२ हजार रुपयांपैकी पहिला १५ हजार रुपयांचा हप्ता घेताना मुल्ला रंगेहात सापडला. (MSEDCL officer arrested in bribery case) मुल्ला याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. 


कार्यालयातच लाच 
सदर लाचेची रक्कम सहायक विद्युत निरीक्षक मुल्ला याने आपल्या कार्यालयातच स्वीकारली. यावेळीच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले. विजापूर नाका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.  

लाच घेण्यासाठी आला !
मुल्ला याच्याकडे सोलापूर आणि कोल्हापूर येथील कार्यभार असल्याने आणि सुट्ट्या असल्याने तो कोल्हापूर येथेच होता परंतु खास लाच घेण्यासाठी तो कोल्हापूर येथून सोलापूरला आला आणि फुकटच्या पैशाच्या मोहापोटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकून थेट गजाआड गेला !

हे देखील वाचा :   (बातमीवर क्लिक करा )



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !