पंढरपूर : सहकारी शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष ऍड दीपक पवार यांच्यातील वाद आता अधिक भडकू लागला असून पवार यांचे सभासदत्व रद्द करण्यावर आज शिक्कामोर्तब झाले ( Sahakar Shiromani Vasantarao Kale Sakhar Karakhana) तर आपण अखेरपर्यंत लढत राहून सत्य बाहेर काढू असा निर्धार पवार यांनी केला आहे.
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली . या सभेत अपेक्षेप्रमाणे कारखान्याचे माजी संचालक आणि राष्टवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ऍड दीपक पवार यांचे कारखान्याचे सभासदत्व रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झाले. काळे आणि पवार यांच्यात गेल्या काही काळापासून वाद पेटलेला असून आरोप आणि प्रत्यारोप यांच्या ठिणग्या सतत उडत आहेत. हा वाद तालुक्यापुरता सीमित राहिला नसून पवार यांनी काळे यांच्याविरोधात ईडी पर्यंत तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीला आपण समर्थपणे सामोरे जाऊ असा आत्मविश्वास कल्याणराव काळे यांनी व्यक्त केला आहे.
काळे - पवार यांच्यातील संघर्ष वाढीला लागत असतानाच आज कल्याणराव काळे यांनी सिक्सर मारला आहे. कारखान्याचे माजी संचालक असलेले ऍड दीपक पवार यांचे सभासदत्वही रद्द करण्यात आले होते आणि कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयावर आज ऍड दीपक पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. (Kalyanrao Kale, Deepak Pawar dispute erupted) सभासदत्व रद्द करण्याच्या मजूर करण्यात आलेल्या ठरावाच्या विरोधात सोलापूर साखर सहसंचालकांच्या न्यायालयात आपण दाद मागणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
दीपक पवार यांनी कारखान्याची बदनामी केली आणि नुकसान केले असा ठपका कारखान्याने पवार यांच्यावर ठेवत त्यांचे सभासदत्व रद्द केल्याने कारखाना वर्तुळात खळबळ उडालीच आहे परंतु तालुक्याच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला आहे. दीपक पवार यांनी मात्र सभासदाच्या हक्कावर गदा आणण्याचा हा प्रकार असल्याचे म्हटले आहे. कोणतेही सबळ कारण नसताना केवळ सूडबुद्धीने हे करण्यात आले आहे त्यामुळे आपणास न्याय मिळणारच आहे पण कल्याणराव काळे यांना आयुष्यभर याचा पश्चाताप करावा लागणार आहे . आपण केलेल्या तक्रारीमुळे कारखान्याचे नुकसान झाले म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे देखील पवार म्हणाले. आपण याबाबत न्याय मागणार असून प्रसंगी न्यायालयात देखील जावू पण अखेरपर्यंत लढा देत राहू असा निर्धार ऍड पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : >>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !