उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाचा राज्यात ऐन उन्हाळ्यात गडगडाटी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Warning of unseasonal rains in Maharashtra) दहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. कडक उन्हाळा आणि त्यात उष्णतेची लाट यामुळे लोक हैराण झाले असून उन्हाचा तडाखा भलताच वाढला आहे. कडक उन्हामुळे उष्माघाताचा धोकाही निर्माण झालेला असून राज्यात तीन शेतकरी उष्माघाताने मृत्युमुखी पडलेले आहेत. मार्च महिना हा तर विक्रमी उन्हाळ्याचा गेला असून एप्रिलमध्येही सरासरी तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने याआधीच जाहीर केले आहे.
पुढील चार ते पाच दिवसात राज्यात पाऊस पडणार असून यावेळी जोरदार वारे देखील वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज पाऊस होण्याची शक्यता असून यामुळे तापमानात घट होऊन उकाडाही कमी होणार आहे. सदर दोन्ही जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज आहे. ५ आणि ६ एप्रिल रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन होणार असून जोरदार वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
यलो अलर्ट !
पुढील तीन दिवसात राज्यात अनेक भागात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहेच पण सोलापूर जिल्ह्यासह दहा जिल्ह्यांना आज ५ एप्रिलसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात आज पावसाच्या सरी कोसळणार असून या दहा जिल्ह्यांना आजच्या दिवसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पावसाने नुकसान
दोन दिवसांपूर्वी झालेल्या रात्रीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. पिके काढणीच्या टप्प्यात असतानाच आणि द्राक्षबागा अंतिम टप्प्यात आलेल्या असताना आलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावलेला आहे. ( Crop damage due to rains) पंढरपूर तालुक्यातील काही द्राक्षबागांना यांना फटका बसला आहे आणि हवामान विभागाने आणखी दिलेल्या इशाऱ्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे. सांगोला तालुक्यातही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !