BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ एप्रि, २०२२

सोलापूरसह सहा जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस !

 




मुंबई : सोलापूर जिल्ह्यासह  सहा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज (unseasonal rain) हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


राज्यातील सर्वच भागात तापमान वाढलेले असून उष्माघाताचे प्रकार समोर येत आहेत त्यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच काढणीला आलेल्या पिकांना तसेच द्राक्षबागांना धोका असल्याने शेतकरी देखील धास्तावले आहेत पण कडक उन्हाळ्यात हवामानाचे अंदाज सतत अवकाळी पावसाची सूचना देत आहेत. ऐन उन्हाळ्यात वाढत्या तपामानासोबत अवकाळी पावसाचे संकट सतत आहे. आज आणि उद्या सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने पुन्हा दिला आहे. हा पाऊस तुरळक ठिकाणी पडणार असला तरी जोरदार (Heavy rain) पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

आज आणि उद्यासाठी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजात सोलापूर जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पण जोरदार आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Unseasonal Heavy rain in six destricts including Solapur) पुढील दोन दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हा पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मात्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जोरदार पावसासह उष्णतेची देखील लाट असे वातावरण राज्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. कुठे पाऊस तर कुठे तपमान वाढलेले दिसणार आहे. अवकाळी पावसामुळे तात्पुरता गारवा जाणवला तरी उकाडा वाढत आहे आणि पुन्हा तापमानात वाढ होताना दिसत आहे त्यामुळे नागरिक एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याने  हैराण झाले असल्याचे दिसत आहे.  


उष्णतेची लाट !
राज्यात काही भागात पावसाचा इशारा देण्यात आलेला असतानाच काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यात अकोला, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश असून उद्या ७ एप्रिल रोजीही या जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असणार आहे.   


हे देखील वाचा : >>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !