मोहोळ : पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांसह सख्खे भाऊ जागीच ठार झाले आहेत तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. ( Accident Pandharpur - Mohol road) एकाच कुटुंबावर आज संकटाचे आभाळ कोसळले आहे.
पंढरीच्या विठूमाऊलीचे दर्शन (Vitthal Darshan Pandharpur) घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रोखडा सावरगाव येथील बेलाळे कुटुंब पंढरीत आले होते. नुकतेच पदस्पर्श दर्शन सुरु झाल्याने दोन वर्षापासून दर्शन न मिळालेले भाविक पंढरीत येत आहेत. दर्शन घेऊन बेलाळे कुटुंब ओमनी कारने ( एम एच १२ एन इ ४४८७) पंढरपूर येथून आपल्या गावी परत निघाले होते. यावेळी सारोळे पाटी येथे हा भीषण अपघात झाला. मोहोळ - पंढरपूर मार्गावरील सोरोळे पाटी जवळ असलेल्या सह्याद्री ढाब्यासमोर एक ट्रक ( एम एच १२ एफ झेड ७३७७) धोकादायक स्थितीत उभा करण्यात आलेला होता. ट्रक उभा करून चालक ढाब्यावर गेला होता. या उभ्या ट्रकला पाठीमागून जावून ओमनी कार वेगाने धडकली. उभ्या ट्रकवर ओमनी कार आदळल्याने अत्यंत मोठा आवाज झाला.
या अपघातात पोलीस कर्मचारी असलेले तीस वर्षे वयाचे दयानंद अण्णाराव बेलाळे आणि त्यांचा भाऊ सचिन अण्णाराव बेलाळे (वय ३२) हे दोघे जागीच ठार झाले आहेत, मयत सचिन बेलाळे यांची पती स्वाती उर्फ राणी सचिन बेलाळे (वय २२), दिपाली उर्फ जयश्री दयानंद बेलाळे (वय २५), आठ वर्षे वयाची त्रिशा आणि अवघ्या एक वर्षाचा श्लोक हे या अपघातात जखमी झाले आहेत. (
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !